Multibagger Stock | सध्या सगळीकडे नोकऱ्यांचे वांदे असल्याने अनेकजण शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करून आपलं नशीब अजमावत आहेत. जगात अश्या अनेक कंपन्या आहेत जे आपल्या गुंतवणूकदारांना आकर्षक रिटर्न देत असतात. या Stock ला मल्टीबैगर स्टॉक्स( Multibagger Stock) म्हणून ओळखलं जातं. आता आपण अशा एका कंपनीबद्दल जाणून घेऊया जिने गेल्या काही वर्षात आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलं आहे. गेल्या पाच वर्षांत या कंपनीच्या स्टॉक्सची किंमत 6,109.2 टक्क्यांनी वाढली, आणि यामुळेच आता सध्या या कंपनीच्या शेअर्सचा भाव 1,218.85 रुपयांपर्यंत वाढलेला आहे.
कोणती आहे ही कंपनी, जी देतेय मल्टीबैगर रिटर्न (Multibagger Stock)
आम्ही तुम्हाला ज्या कंपनीच्या शेअर्सबाबत सांगत आहोत त्या कंपनीचे नाव आहे वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी. या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना दमदार असा रिटर्न दिलाय. उदाहरण द्यायचं झाल्यास, केवळ तीन वर्षांतच आपल्या गुंतवणूकदारांना कंपनीने 1 लाखाच्या गुंतवणूकीवर 80 लाख रुपयांचा भरभक्कम रिटर्न दिला आहे.
का देऊ शकली कंपनी मोठा रिटर्न?
वारी रिन्यूएबल टेक्नॉलॉजी( Waree Renewable Technologies) ही कंपनी सोलार इंजिनीयरिंग आणि कन्स्ट्रक्शनच्या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे. या कंपनीला हल्लीच एक मोठा प्रोजेक्ट मिळाला होता. 52.6MPW चे सोलार प्लांट सुरू करण्याची ही ऑर्डर होती, जी या वर्षाच्या शेवटपर्यंत पुर्ण होणार आहे. या भल्यामोठ्या ऑर्डरमुळेच कंपनी (Multibagger Stock) आपल्या गुंतवणूकदारांना मोठा रिटर्न देऊ शकली आहे.
कंपनीची ही सुस्थितीत दिवसेंदिवस गुंतवणूकदारांचा फायदा करून देणारी ठरत आहे. गेल्या महिन्यांत मात्र कंपनीच्या शेअर्स कमी झाले होते, पण त्यानंतर लगेच आलेल्या संधीमुळे कंपनीचे शेअर्स पुन्हा वाढत गेले. आत्ता सध्या स्टॉक मार्केटमध्ये या कंपनीचा भाव 1,238.80 पर्यंत पोहोचला आहे.