Multibagger Stocks : ‘या’ हॉस्पिटल्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती

बिझनेसनामा ऑनलाईन । शेअर मार्केट म्हणलं की चढ- उतार हे आलेच. असे अनेक शेअर्स असतात ज्याच्या खरेदीमुळे गुंतवणूकदारांना मोठा आर्थिक फटका बसतो तर असेही काही शेअर्स (Multibagger Stocks) असतात जे आपल्या गुंतवणूकदारांना अगदी कमी वेळेत मालामाल करून सोडतात. आज आम्ही तुम्हाला अशाच एका शेअर्स बद्दल सांगणार आहोत ज्याने आपल्या गुंतवणुकदारांना करोडपती बनवलं आहे. हा शेअर्स आहे अपोलो हॉस्पिटलचा. या शेअर्सने 20 वर्षांत आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवलं आहे.

2003 मध्ये किंमत फक्त 48 रुपये- (Multibagger Stocks)

70,019 कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या या रुग्णालय क्षेत्रातील कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना फायदा झाल्याची चर्चा चांगलीच जोर धरत आहे. मार्च 2003 अखेरपासून 29 ऑगस्ट 2023 पर्यंत या स्टॉकची किंमत 4823 रुपयांनी वाढली आहे. 2003 मध्ये या शेअरची किंमत फक्त 48 रुपये होती. परंतु आता शेवटच्या दिवशी, अपोलो हॉस्पिटलचा स्टॉक ₹ 4861.05 वर उघडला आणि ₹ 4859.2 वर बंद झाला. दिवसभरात पोहोचलेली सर्वोच्च किंमत ₹ 4914.15 होती, तर सर्वात कमी किंमत ₹ 4841.7 होती. कंपनीचे बाजार भांडवल ₹ 70540.03 कोटी आहे. अपोलो हॉस्पिटलच्या स्टॉकचा 52 आठवड्यांचा उच्चांक ₹ 5362 आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक ₹ 3989.1 आहे. दिवसासाठी बीएसई इंडेक्स 2529 शेअर्स होता.

अपोलो हॉस्पिटल स्टॉक (Multibagger Stocks) लिस्ट झाल्यापासून आत्तापर्यंत गुंतवणूकदारांना 26,251.35 टक्के परतावा दिला आहे. दुसरीकडे, गेल्या पाच वर्षांत या शेअरद्वारे मिळालेल्या परताव्यावर नजर टाकली तर ती 311.34 टक्के आहे. त्याचबरोबर गेल्या वर्षभरात या शेअरच्या किमतीत १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझ लि.चा महसूल ₹4,451.90Cr होता. गेल्या तिमाहीपासून वार्षिक आधारावर महसूल 16.8% ने वाढला आहे. अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझ लि. चा नफा जून 2023 ला संपलेल्या तिमाहीत ₹166.60Cr होता. गेल्या तिमाहीपासून वार्षिक आधारावर नफा -47.48% कमी झाला आहे.