Multibagger Stocks : कीटकनाशके तयार करणाऱ्या ‘या’ कंपनीने गुतंवणूकदारांना केलं करोडपती

बिझनेसनामा ऑनलाईन । शेतीच्या कामासाठी कीटकनाशके, तणनाशक बनवणारी कंपनी बेस्ट ऍग्रोलाइफनेच्या शेअर्सनी (Multibagger Stocks) शेअर बाजारात अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. मागील 5 वर्षात बेस्ट ऍग्रोलाइफच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल 24745% रिटर्न दिला आहे. म्हणजेच जर कोणी 5 वर्षांपूर्वी बेस्ट ऍग्रोलाइफच्या शेअर मध्ये 41 हजारांची गुंतवणूक केली असती तर आज तीच व्यक्ती चक्क करोडपती झाली असती. सर्वात कमी काळात इतक्या मोठ्या प्रमाणात रिटर्न देणारा हा एकमेव स्टॉक आहे.

22 जून 2018 रोजी बेस्ट अॅग्रोलाइफचे शेअर्स अवघ्या 4.20 रुपयांना खरेदी करता येत होते. आता मात्र 5 वर्षांनी या शेअरची किंमत 1043.50 रुपये झाली आहे. मागील वर्षी 1 जुलै 2022 रोजी बेस्ट अॅग्रोलाइफचा शेअर 798.60 रुपयांच्या नीचांकावर होता . यानंतर 5 वर्षांनी या शेअर्स मध्ये तब्बल 122 टक्क्यांची वाढ झाली आणि शेअर 1774.45 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला. बेस्ट ऍग्रोलाइफच्या शेअर्सच्या सध्याच्या हालचालींबाबत सांगायचं झाल्यास BSE म्हणजेच बॉम्बे स्टोक एक्सचेंज मध्ये या कंपनीचा शेअर 0.78 टक्क्यांनी वाढून 1046.85 रुपयांवर व्यवहार करत आहे. आत्तापर्यंत या महिन्यांमध्ये बेस्ट ऍग्रोलाइफच्या शेअर्समध्ये 13% ची वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

बेस्ट ऍग्रो लाइफ नेमकी कशा संदर्भात आहे? (Multibagger Stocks)

बेस्ट ऍग्रो लाइफ ही एक अशी कंपनी आहे जी कीटकनाशके, तणनाशके, बुरशीनाशके आणि वनस्पतींच्या वाढीचे प्रॉडक्ट तयार करते. ज्यामुळे तणांवर बसणारे कीटक, तसेच पिकांना हानी पोहोचवणारी बुरशी नष्ट करण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर पिकांच्या वाढीला गती मिळावी अशा प्रकारचे प्रॉडक्ट सुद्धा बेस्ट ऍग्रो लाइफ कंपनी तयार करते. शेतीसाठी महत्त्वाचे प्रॉडक्ट असल्याने संपूर्ण जगभरात त्याची मोठ्या प्रमाणात विक्री होते.