Multibagger Stocks : अनेक वर्ष वाट पाहायला लावून आज रामलला अयोध्येत परतणार आहेत. कैक वर्षांपासून ज्या दिवसासाठी आपली उत्सुकता ताणून राहिली होती तो क्षण आता काही मिनिटांच्या वाटेवर येऊन ठेपलाय आणि श्रीरामांना वंदन करण्यासाठी आज शेअर बाजार बंद ठेवण्यात आला आहे. अयोध्येत मंदिर निर्माणामुळे अनेक कंपन्यांचे शेअर्स तेजी पकडून वावरत आहेत, आणि अश्यात येणाऱ्या पर्यटकांसाठी टेन्ट बनवण्यात व्यस्त असलेल्या प्रवेग या कंपनीचे शेयर (Praveg Ltd Share) आकाशालाच कवटाळून बसलेत. बाजाराची हि बदललेली स्थिती पाहता राम मंदिर हे केवळ श्रद्धाळुंसाठीच नाही तर बाजारासाठी सुद्धा कल्याणकारी ठरत आहे याचा पुरावा मिळतो.
या शेअरने दिला भरगोस नफा : (Multibagger Stocks)
अयोध्येच्या संपूर्ण वातावरणाची वेगळी ओळख करून देण्याची गरज आता उरलरली नाही, कारण देशातील प्रत्येक कोपरा आत्ताच्या घडीला अयोध्येच्या रूपात परिवर्तित झालेला आहे आणि देशातील बाजाराला देखील यामुळे भरगोस नफा कमावण्याची संधी मिळत आहे. अयोध्येत कार्यरत असलेल्या अनेक कंपन्यांपैकी Praveg Ltd या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना भरगोस परतावा मिळवून दिला आहे. हि कंपनी अयोध्येत येणाऱ्या पर्यटकांसाठी टेन्ट सिटी बनवण्याचं काम करते. एवढंच नाही तर कमीत कमी काळात भरपूर नफा मिळवून देणाऱ्यांपैकी एक म्हणून आता या कंपनीची ओळख केली जात आहे. काही काळापूर्वी जो शेअर केवळ 2 रुपयांवर व्यवहार करत होता आज त्याच शेअरची किंमत 1100 च्या जवळ येऊन पोहोचली आहे. काल शेअर बाजारात व्यवहार करीत असताना या शेअरने 1134 चा पल्ला गाठला होता, मात्र त्यानंतर आलेल्या क्वचित घसरणीमुळे शेवटी बाजार बंद होताना या शेअरला 1070.30 वर आटोपतं घेणायची वेळ आली.
या शेअर बद्दल जर का मागे जाऊन पाहिलं तर वर्ष 2019 मध्ये हा केवळ 2.37 रुपयांवर व्यवहार करीत होता, आणि गेल्या शनिवारी याच शेअरने 1134 रुपयांचा आकडा गाठला. गेल्या पाच वर्षांमध्ये कंपनीच्या या शेअरने गुंतवणूकदारांना 44,310 रुपयांचा भरगोस परतावा दिला आहे, आणि केवळ सहा महिन्यांच्या कालावधीत 127 टक्क्यांचा परतावा दिलेल्या या शेअरने गुंतवणूकदारांना लखपती आणि करोडपती बनवलं आहे.
अयोध्येसोबत संबंध काय?
अयोध्येत सुरु असलेल्या मंदिर लोकार्पण सोहळ्यामुळे तिथे पर्यटकांची ये-जा वाढली आहे, आणि Praveg Ltd ही कंपनी अयोध्येचे रूपांतर एका टेन्ट सिटीमध्ये करण्याची जबाबदारी उचलून कार्य करीत आहे. कंपनीने वर्ष 2023 मध्ये अयोध्येत एका Luxury Resort ची सुरु केली होती. केवळ अयोध्याच नाही तर कंपनीचे काही प्रोजेक्ट्स वाराणसी आणि लक्ष्यद्वीपमधेही सुरु आहेत(Multibagger Stocks), म्हणूनच आज लोकार्पण सोहळा पूर्ण झाल्यानंतर येणाऱ्या काळात कंपनी गुंतवणूकदारांना आणखीन फायदा करून देईल अशी अपेक्षा वाटते.