Multipurpose Society Scam : या पतसंस्थेच्या 22 शाखा अचानक बंद; पुणे, नगर जिल्ह्यात खळबळ

Multipurpose Society Scam: तुम्ही अनेक छोट्या मोठ्या शहरांमध्ये काही पतसंस्था पहिल्या असतील. या संस्था अडलेल्या काळात गरजू माणसांना पैश्यांची मदत पोहोचवतात, तसेच आसपासची मंडळी अश्या संस्थांमध्ये पैश्यांची गुंतवणूक करू शकतात. मात्र काल पुण्यासह नगरमधून एक महत्वाची बातमी समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या या माहितीनुसार अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यात कार्यक्षेत्र असलेल्या एका नामांकित पतसंस्थेने आपल्या 22 शाखा एकाचवेळी बंद केल्या आहेत. या अचानक घेतलेल्या निर्णयामुळे बाजारात खळबळ उडाली आहे. संस्थेमध्ये गुंतवणूक केलेल्या गुंतवणूकदारांच्या मनात या निर्णयाच्या परिणामी चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

पुणे जिल्ह्यातील पतसंस्था कायमची बंद: (Multipurpose Society Scam)

नगर आणि पुणे जिल्ह्यातील मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह पतसंस्थेच्या 22 शाखा अचानक बंद पडल्या आहेत. काल सकाळी ठेव परत घेण्यासाठी आलेल्या ठेवीदारांना पैसे नाहीत असे कारण देऊन शाखांमधून परत पाठवण्यात आले होते, तसेच शाखा बंद असल्याचे सांगून व्यव्यस्थापकांनी सर्वांना मागे फिरवले आणि म्हणूनच ठेवीदारांची धांदल उडाली. नेमके किती पैसे या संस्थांमध्ये अडकून पडलेले आहेत याचा अंदाज लावता येत नसला तरी जवळपास कोट्यवधी रुपये अडकून पडल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे.

सदर मल्टीस्टेट सोसायटीच्या कमीत कमी 4 ते 5 शाखा नगर मध्ये उपलब्ध आहेत तसेच आजूबाजूच्या ग्रामीण भागात सोसायटीच्या एकूण 15 शाखा काम करीत होत्या आणि इतर 7 शाखांचा पुणे जिल्ह्यात विस्तार पाहायला मिळतोय. अश्या नामांकित सोसायटीने अचानक ग्राहकांना परत फिरवल्याने सर्वांच्या मनात शंकेची पाल चुकचुकत आहेत, या सोसायटीमध्ये सर्वसामान्य लोकं गुंतवणूक करतात म्हणून गुंतवलेल्या पैश्यांबद्दल ते चिंतेत आहेत.

कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांपासून दिला नाही पगार:

पुणे जिल्ह्यातील या पतसंस्थेने (Multipurpose Society Scam) ग्राहकांच्या सुरक्षिततेसाठी अनेक शिपाई तैनाद ठेवले होते तसेच ग्राहकांचे कामकाज व्यवस्थित चालू राहण्यासाठी वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली होती. मात्र आता समोर आलेली बातमी सांगते कि संस्थेकडून या कर्मचाऱ्यांना गेल्या पाच महिन्यांनपासून पगार देण्यात आलेला नाही. संस्थेकडून माघारी फिरवल्यानंतर ठेवीदारांनी याच कर्मचाऱ्यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर असण्याची माहिती देण्यात आली. चारही बाजूंनी हतबल झालेल्या ठेवीदारांना सध्या कोणताही मार्ग दिसत नाही आहे, तसेच या संस्थेला आता कायमचे कुलूप लागणार कि कामकाज पुन्हा सुरु होणार याचीही कोणी ग्वाही देत नाही.