Mutual Fund : मुलांच्या भविष्याची चिंता सोडा; ‘या’ म्युच्युअल फंड मध्ये करा पैशाची गुंतवणूक

बिझनेसनामा ऑनलाईन । मुलांच्या भविष्याची चिंता सतत आई-वडिलांना सतावत असते. घरात मूल जन्मल्यापासून ते मूल मोठं होईपर्यंत त्यांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू पासून ते शिक्षण, करिअर या सर्वांचा विचार आई-वडील करत असतात. आणि त्यांच्या भविष्यासाठी लागणारा पैसा थोडा थोडा करत त्यांच्या बजेट मधून बाजूला काढून ठेवत असतात. बाजारात मुलांसाठी अनेक म्युच्युअल फंड योजना (Mutual Fund) आहेत. त्यामध्ये कोणतीही रिस्क नसून स्मॉल सेविंग वर मिळणारा परतावा हा जास्त काळ महागाईच्या जमान्यात हवा तसा मिळू शकत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे वाढत असलेल्या महागाईमुळे भविष्यात मुलांच्या इच्छा पूर्ण होऊ शकत नाही. म्हणून अजून एक पर्याय मुलांच्या भविष्यासाठी उपलब्ध आहे. पर्याय म्हणजे चाइल्ड केअर फंड. तुम्ही देखील तुमच्या मुलांच्या भविष्याचा विचार करत असाल तर चिल्डर्न्स म्युच्युअल फंड मध्ये तुम्ही गुंतवणूक करू शकतात. यामुळे तुमच्या मुलांच्या भविष्याची चिंता तुम्हाला सतावणार नाही.

चाईल्ड म्युच्युअल फंड काय आहे? (Mutual Fund)

चाईल्ड म्युच्युअल फंडची खासियत म्हणजे सुरक्षितता. चाइल्ड म्युच्युअल फंड्स (Mutual Fund) म्हणजे इन्व्हेस्टरच्या मुलांसाठी निधींची केयर घेणारी फायनान्सियल योजना आहे. हे फंड्स योग्यरित्या विविध निधींचे विभाजन करतात. यासाठी सुरक्षितता म्हणून म्हणजे कॉर्पसचा एक भाग वापरला जातो ज्यामध्ये गुंतवणूक केली जाते. या फंड मध्ये कॉर्पसचा काही भाग कर्ज योजना किंवा सुरक्षित समजल्या जाणार्‍या कर्ज बाँडमध्ये गुंतवला जातो. आणि कॉर्पसचा दुसरा भाग देखील इक्विटीमध्ये गुंतवला जातो. यामध्ये कर्जाच्या किंवा रोख्यांच्या तुलनेत जास्त परतावा मिळतो. यानंतर ते डेट स्कीमसाठी किंवा डेट बॉन्डसाठी इन्वेस्ट केली जाते. आणि ही इन्व्हेस्टमेंट मुलांच्या शिक्षण, पदवी, विवाह, कृषि इत्यादीसाठी वापरले जाते. ही योजना सुरक्षित आहे. म्हणजे तुमच्या मुलांना या वित्तीय योजनेतील निधींच्या विविध प्रकारांचा लाभ मिळू शकतो.

चिल्ड्रेंस म्यूचुअल फंड (Mutual Fund) हा 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांसाठी आहे, ज्यामध्ये पालकांच्या देखरेख नुसार गुंतवणूक केली जाते. यात 5 वर्षांचा लॉक-इन कालावधी असते. यामध्ये मुलांचे वय 18 वर्षे पूर्ण झाल्या नंतर त्याला त्या खात्याचा अधिकार मिळतो. म्युच्युअल फंड म्हणजे मुलांच्या गुंतवणूकिमध्ये निधीचे व्यवस्थापन करण्याची एक चांगली पद्धत आहे. त्यांच्या भविष्यासाठी हा फंड उपलब्ध आहे. साधारणतः 10 ते 20 वर्षे कालावधी या फंड साठी असतात. अवधीत बाजारातील जोखीम लक्षात घेतली जाते . त्यामुळे एक्विटी फंडमध्ये सिस्टेमॅटिक इन्वेस्टमेंट प्लान (SIP) वापरून गुंतवणूक करणं गरजेचं असतं.