Mutual Fund मध्ये गुंतवणूक करून तुम्ही जगात हवं तिथे फिरायला जाऊ शकता! कस ते जाणून घ्या…

बिझनेसनामा ऑनलाईन । रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढून लांब कुठं तरी फिरायला जायचं प्रत्येकाचं स्वप्न असत. कोणाला समुद्रकिनारी जाऊन शांत वेळ घालवायला आवडतो तर कोणाला ट्रेकिंग वगैरे करण्यात आनंद मिळतो. अनेकांना लांब कुठल्यातरी देशात अनेक दिवसांची रजा घेऊन मनसोक्त राहायला जायची इच्छा असते. परंतु यातील खूप कमी लोक आपली हि स्वप्ने पूर्ण करतात. बऱ्याचदा आपण अगदी बॅग भरून तयार असतो मात्र पैशांच्या अडचणीमुळे आपल्याला ट्रिप रद्द करावी लागते. आज आम्ही तुम्हाला Mutual Fund मध्ये गुंतवणूक करून जगात हवं तिथे फिरायला जाण्याची एक ट्रिक सांगणार आहोत.

कामावर रजा टाकून सुट्ट्यांचा आनंद घ्यायचा असेल तर पैशांची व्यवस्थित जुळवणी करणे खूप गरजेचे आहे. फिरायला जायचं म्हटलं तर कितीही काटकसर केली तरी पैसे हे लागतातच. तेव्हा अपुऱ्या तयारीनिशी जाणं तुमच्या अंगलट येऊ शकतं. राहणे, जेवण व इतर मनोरंजन ऍक्टिव्हिटी म्हटलं कि पैसे मोजल्याशिवाय काही कोणी देत नाही. तेव्हा आपणच जर अगोदरपासून खास ट्रीपसाठी वेगळी पैशांची तजवीज करून ठेवली तर आर्थिक नियोजन न ढासळत मनसोक्त फिरण्याचा आनंद घेता येऊ शकतो. पण हि पैशांची तजवीज नक्की कशी करावी हे अनेकांच्या लक्षात येत नाही. आज आम्ही तुम्हाला याबाबतच माहिती सांगणार आहोत.

Mutual Fund मध्ये गुंतवणूक करून फिरण्यासाठी पैशांची तजवीज कशी करायची?

  1. स्वतःसाठी डेडलाईन बनवणे गरजेचे – कोणतेही ध्येय पूर्ण करण्यासाठी विशिष्ट वेळ किंवा अंतिम मुदत आवश्यक असते. तुम्हाला नक्की किती दिवसांनी रजा घ्यायची आहे, कुठे जायचे आहे यासारख्या गोष्टी अगोदरच ठरवणे गरजेचे आहे. तुम्हाला प्रवासाला निघण्यास अजून काही दिवस बाकी असतील तर तोवर तुम्ही SIP मध्ये गुंतवणूक करू शकता. यानंतर यातून आलेल्या पैशांतून तुम्ही बोनस म्हणून ट्रिप प्लान करू शकता.
  2. किती रुपये साठवायचे याचे एक टार्गेट निश्चित करा : तुम्हाला सुट्टीत कुठे जायचे आहे? तेथे राहण्याच्या आणि प्रवासाचा खर्च किती होईल? याबाबत आधीच अंदाज लावा. त्यानुसार पैसे वाचवण्यासाठी Mutual Fund सुरू करा. यावरून तुम्हाला किती काळासाठी किती गुंतवणूक करायची याची दिशा मिळेल. तसेच, तुम्ही तुमच्या बजेटमध्ये तुमच्या आवडीच्या ठिकाणी प्रवास करू शकाल.
  3. तुम्ही किती रिस्क घेऊ शकता याचा अंदाज घ्या : प्रत्येक गुंतवणूकदाराची जोखीम उचलण्याची क्षमता वेगवेगळी असते. तुमच्या जोखमीच्या क्षमतेचे मूल्यांकन करणे तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही बाजारातील जोखमीच्या अधीन आहे. गुंतवणुकीच्या परताव्यात चढ-उतार असू शकतात हे उघड आहे. अल्पावधीत तुम्ही किती तोटा किंवा परताव्यातील चढ-उतार सहन करू शकता याचे आकलन तुम्हाला करावे लागेल.

आता विलंब न करता, तुमचे आवडते सुट्टीचे ठिकाण निवडा. बजेट न मोडता तुमच्या स्वप्नातील सुट्टी पूर्ण करण्यासाठी आजच सुरुवात करा. तुमच्या कष्टाच्या पैशाने तुमचे प्रत्येक स्वप्न पूर्ण करा.