Mutual Fund । पैशांची बचत करते आणि पैसे गुंतवणे या दोन्ही प्रक्रियांचा अर्थ एकाच होतो कि या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत? या महागाईच्या काळात आपण पैसे गुंतवावे कि त्यांची बचत करावी ? असे अनेक प्रश्न मनात असतील तर चिंता करू नका. आज आपण जाणून घेऊया कि आपले जीवन शेवटपर्यंत सुखी व्हावं यासाठी नेमकं काय करण्याची गरज आहे.
सध्याची परिस्थिती काय आहे ?
गेल्या आठवड्यात निफ्टीने 20 हजारांचा पल्ला गाठला होता. दिवसेंदिवस महागाई मात्र वाढत आहे, ऑगस्टच्या महिन्यात हा टक्का 6.8% होता. अश्या परिस्थितीत पैश्यांची योग्य गुंतवणूक करणे महत्वाचं आहे. कारण वाढत्या महागाईसोबत जगण्यासाठी हातात असलेला पैसा देखील वाढणं गरजेच आहे. साठवलेल्या पैश्यांची किंमत ही वेळेनुसार कमी होत जाईल व हाती काहीच लागणार नाही, त्यामुळे वेळीच गरज ओळखून वागावं. बँक खात्यात पडलेल्या निधीचे कालांतराने मूल्य कमी होऊ शकते, तसेच सोन्यात केली गुंतवणूक सुद्धा फार मोठा रिटर्न देईल अशी काही शक्यता नाही.
पैशाची बचत आणि गुंतवणूक दोन्हीही वेगवेगळं आहे-
भविष्यातील गरजा पुरवण्यासाठी जाणीवपूर्वक पैसे बाजूला काढून ठेवणे म्हणजे पैश्यांची बचत करणे होय, तर म्युच्युअल फंडातील (Mutual Fund) शेअर्स सारख्या गोष्टींमध्ये पैसे गुंतवून त्यांची किंमत वाढवणे म्हणजे पैश्यांची गुंतवणूक करणे आहे.
म्युच्युअल फंड मध्ये करू शकता गुंतवणूक – Mutual Fund
बँकेत किंवा सोनं घेऊन केलेली गुंतवणूक हि काही महागाईशी दोनहात करण्यासाठी पुरेशी नाही. पण जर का अश्या वेळी कोणी मदत करू शकत असेल तर ती म्हणजे पैश्यांची योग्य गुंतवणूक. अशावेळी म्युच्युअल फंडसारख्या स्टॉक मध्ये सुरवातीला गुंतवणूक करणे हा सर्वात सोपा मार्ग आहे. Equity Funds हे विविध प्रकारचे असतात, ज्यात लार्ज कॅप फंड्स( Large Cap Funds), मिड कॅप फंड्स ( Mid Cap Funds), स्मॉल कॅप फंड्स ( Small Cap Funds), मल्टी कॅप फंड्स ( Multi-Cap Funds), फ्लेक्सी कॅप फंड्स( Flexi Cap Funds) यांचा समावेश होतो. या फंडमध्ये पैशाची गुंतवणूक केल्यास तुम्ही चांगल्या प्रमाणात रिटर्न मिळवू शकता.