Mutual Fund Investment : जे काही पैसे आपण कमावतो त्यांना सुरक्षित दृष्ट्या गुंतवण्यासाठी आपण काही संस्थांच्या शोधात असतो. यात कधी LIC तर कधी Mutual Fund चा समावेश होतो. जिथे गुंतवणूक करणार आहोत तिथून शक्यतो जास्ती परतावा मिळावा आणि पैसे सुरक्षित राहावेत म्हणून आपण जोखीम घेण्याआधी भरपूर विचार करतो. मात्र आता म्युचुअल फंड्स मध्ये काही जोखीम आठळून आल्यामुळे गुंतवणूकदर सतर्क झाले आहेत, आता गुंतवणूक करण्याआधी ते विचार करत आहेत आणि अश्या लोकांचे प्रमाण वाढलेलं आहे असा निशार्ष एक्सिस म्युचुअल फंडने नोंदवला आहे.
काय म्हणतोय एक्सिस म्युचुअल फंड? Mutual Fund Investment
एक्सिस फंडच्या वतीने हल्लीच एक सर्वेक्षण करण्यात आले,यात जवळजवळ 17 हजार गुंतवणूकदारांनी भाग घेतला होता. गुंतवणूकदारांनी कोणतीही गुंतवणूक करण्याआधी विचार करावा, गरजेची सगळी काळजी घ्यावी अशी माहिती प्रत्येक कंपनी देत असते, मात्र यात किती धोका असू शकतो याचा अंदाज घेण्यासाठी हे सर्वेक्षण करण्यात आले होते.
सर्वेक्षणातून आलेली माहिती सांगते कि 59 टक्के गुंतवणूकदार कोणतीही गुंतवणूक करण्याआधी कंपनीचा इतिहास पाहतात, किंवा अनेकवेळा गुंतवणूक करताना बाजारातील परिस्थिती काय आहे याचा परिणाम त्यांच्या गुंतवणूक करण्याच्या निर्णयावर होत असतो. 22 टक्के इक्विटी गुंतवणूकदार हे दोन वर्षांसाठी गुंतवणूक करतात तर 48.7 टक्के गुंतवणूकदार हे केवळ दोन वर्षांच्या आतच वेगळा पर्याय शोधतात. 89 टक्के गुंतवणूकदार हे योग्य म्युचुअल फंड निवडताना (Mutual Fund Investment) धोका पत्करण्याची तयारी दाखवतात, तर केवळ 27 टक्के गुंतवणूकदार हे असलेल्या जोखमीचा विचार करतात.यात 53 टक्के गुंतवणूकदार असेही आहेत जे अश्या प्रकारचा कोणताही विचार अजिबातच करत नाहीत.
गुंतवणूकीबद्दल काय आहे एक्सिसचे मत:
गुंतवणूकदरांनी गुंतवणूक करण्याधी सर्व फायदे तोटे लक्ष्यात घेत आपल्याला सोयीस्कर ठरणारा पर्याय निवडावा, कारण प्रत्येक गुंतवणूकदाराची निवड हि वेगळी असते. मात्र एकूण सर्वेक्षणातून जोखीम आणि जोखीम व्यवस्थापन समजून घेण्याची इच्छा आहे अशी चिन्ह समोर आली आहेत. मात्र काळजीची बाब म्हणजे केवळ 30 टक्के लोकांना याची माहिती आहे आणि त्यातूनही फक्त 12 टक्के गुंतवणूकदार याचा वापर करतात, आणि बाकी 64 टक्के लोकांना याची माहिती देखील नाही. शेवटी एक साकारात्मक गोष्ट समोर आली ती म्हणजे यात अजूनही काही लोकं अशीही आहेत ज्यांना रीस्कोमिटर बदल जाणून घेण्याची उत्सुकता आहे.