Namita Thapar Success Story: शार्क टॅंक इंडियाच्या Phar”maa”ची अशी आहे कहाणी

Namita Thapar Success Story: नामिता थापर या भारतातील व्यवसायाच्या क्षेत्रात यशस्वी महिलांमध्ये अग्रगण्य आहेत. एमक्योर फार्मास्युटिकल्स(Emcure Pharmaceuticals) च्या भारतातील व्यवसायाच्या कार्यकारी संचालक म्हणून त्यांनी आरोग्य क्षेत्राला मोलाचे योगदान दिले आहे. त्याचबरोबर “शार्क टँक इंडिया” या रिअलिटी शोमध्ये गुंतवणूकदार म्हणून त्यांनी प्रसिद्धी मिळवली. त्यांचे निर्णयक्षम व्यक्तिमत्व आणि उद्योजकांना दिलेले प्रोत्साहन हे त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे. सोबतच त्या समाज सेवाही प्राधान्याने करतात, त्यामुळेच नूतन आणि आकांक्षी उद्योजकांना मदत करणे हे त्यांचे ध्येय आहे.

नमिता थापर यांचे बालपण आणि शिक्षण: (Namita Thapar Success Story)

नमिता थापर यांचा जन्म पुण्यात 1977 साली सतीश आणि भावना मेहता यांच्या पोटी झाला. त्या पुण्यातच वाढल्या आणि तिथेच त्यांचे सुरुवातीचे शिक्षण झाले. सतीश मेहता हे पुण्यातील एमक्युअर फार्मास्युटिकल्स(Emcure Pharmaceuticals) चे संस्थापक होते आणि त्यांच्या कुटुंबात व्यवसाय सुरू करणारे ते पहिलेच व्यक्ती म्हणावे लागतील, त्यामुळे नमिता यांना व्यवसायाचे संस्कार लहानपणापासूनच मिळाले. पुण्यातच त्यांचे शालेय शिक्षण झाले आणि त्यानंतर त्यांनी CA ची पदवी घेतली. पुढे त्यांनी अमेरिकेतील ड्यूक विद्यापीठातून MBAची पदवीही मिळवली.

नमिता यांचे काम कसे आहे?

सहा वर्षे अमेरिकेच्या गायडंट कॉर्पोरेशनमध्ये काम करून नमिता थापर पुढे एम्क्योर फार्मास्युटिकल्स(Emcure Pharmaceuticals)च्या मुख्य आर्थिक अधिकारी (CFO) म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून तिच्या कारकीर्दीला झपाट्याने वर चढताना दिसते. नमिता सध्या एम्क्योर फार्मास्युटिकल्सच्या भारतीय व्यवसायात यशस्वी उद्योजिका आहेत आणि आपण त्यांना ओळखतो ते शार्क टँक इंडिया मध्ये शार्क म्हणून गुंतवणूक केल्याने(Namita Thapar Success Story).

नमिता Fuqua School of Business India च्या रीजनल ॲडव्हायजरी बोर्डाची(Regional Advisory Board) सदस्य आहे. समाजकार्याप्रती सक्षम असलेल्या नमिता 11 ते 18 वर्षांच्या मुलांसाठी व्यवसाय शिक्षण देणाऱ्या इनक्रेडिबल वेंचर्स लिमिटेड चालवतात तसेच नवीन व्यवसाय आणि महत्वाकांक्षी उद्योजकांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने TiE मुंबईच्या बोर्ड ऑफ ट्रस्टींमध्ये ट्रस्टी म्हणून जबाबदारी सांभाळतात.