बिझनेसनामा ऑनलाईन । मित्रानो, आजकाल वाढत्या बेरोजगारीमुळे नोकऱ्यांचे वांदे झाले असून अनेक तरुणांचा कल हा व्यवसायाकडे वळत आहे. घराच्या आसपास कोणताही व्यवसाय करून नोकरीच्या पगारातून जितके पैसे मिळतात तेवढे मिळाले तरी बस पण घरची कामे बघत बघत व्यवसायच करावा असं अनेकांना वाटू लागलं आहे. परंतु नेमका कोणता व्यवसाय करावा असा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही सुद्धा नव्या व्यवसायाच्या शोधात असाल पण तुम्हाला त्याची आयडिया सापडत नसेल तर आज आम्ही तुम्हाला अशा एका व्यवसायबद्दल सांगणार आहोत, ज्याच्या माध्यमातून दर महिन्याला १ ते २ लाख रुपये आरामात कमवू शकता. आणि महत्त्वाचे म्हणजे हा व्यवसाय तुम्ही ग्रामीण भागातही करू शकता आणि शहरात सुद्धा करू शकता.
हा व्यवसाय म्हणजे शेव- फरसाणा यासारख्या नमकीन पदार्थांचा व्यवसाय… आज आपण बघितलं तर लग्नाच्या कार्यक्रमात या पदार्थाना जास्त मागणी येते, तसेच कोणताही सण आला, किंवा आपल्या घरी पाहुणे जरी आले तरी मिठाईसोबत फराळ हा दिलाच जातो. अगदी लहान मुलांपासून ते वृद्ध लोकांपर्यंत प्रत्येकालाच हे पदार्थ आवडतात त्यामुळे या व्यवसायाला अजूनही प्रचंड मागणी आहे.
कसा सुरु करायचा व्यवसाय –
हा व्यवसाय करण्यासाठी छोटे दुकान किंवा कारखाना तयार करावा लागले. त्यासाठी ४00 चौरस फूट ते ७00 चौरस फूट जागा आवश्यक आहे. नमकीन बनवण्यासाठी सेव मेकिंग मशीन, पॅकिंग मशीन, फ्रायर मशीन, मिक्सिंग मशीन, पॅकेजिंग आणि वेट मशीनची गरज आहे. तसेच हा व्यवसाय पदार्थाशी समबंधित असल्याने अन्न परवाना मिळवावा लागेल. याशिवाय MSME नोंदणी आणि GST नोंदणी यासारख्या सर्व आवश्यकता पूर्ण कराव्या लागतील. जर तुम्हाला तुमच्या कंपनीच्या नावाने नमकीन व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला ट्रेडमार्क नोंदणी देखील करावी लागेल.
पदार्थ बनवण्यासाटी कच्चा माल म्हणजेच गोडेतेल, बेसन, मसाले, मैदा, मीठ, शेंगदाणे, वेगेवेगळ्या डाळी लागतील. तसेच हे काम एकट्याच नसल्याने हाताखाली २-३ कर्मचारी सुद्धा असावे. नमकीनच्या व्यवसायात तुम्ही मोठ्या प्रमाणात नफा मिळवू शकता. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला 2 लाख आणि6 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करावी लागेल. पण एकदा का जम बसला कि कायमस्वरूपी पैसे कमवू शकता. जर तुम्ही सुरुवातीला एका पॅकेटवर 5% ते 10% मार्जिन ठेवले तर तुम्हाला विक्रीनुसार चांगले पैसे मिळू शकतात. परंतु तुम्हाला तुमची क्वालिटी चांगली ठेवावी लागेल.