Narayan Murthy: चार महिन्यांचा नातू बनला करोडपती; आजोबांनी दिलेत 240 कोटींचे शेअर्स

Narayan Murthy: देशातील युवा पिढीने सत्यातने काम केले पाहिजे, किंबहुना आठवड्यातून 70 तास काम केले पाहिजे असे म्हणणारे इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती नेहमीच चर्चेचा भाग बनलेले असतात आणि आज पुन्हा एकदा सर्वांची नजर नारायण मूर्ती यांच्यावर खिळली आहे, कारण माहिती आहे का? नसेल तर ही बातमी नक्की वाचा कारण आज नारायण मूर्ती यांनी एक वेगळाच चमत्कार करून दाखवला आहे, त्यांनी तब्बल चार महिन्यांच्या नातवाला करोडपती बनवलं आहे.

नातवाला दिली शेअर्सची भेट: (Narayan Murthy)

इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती यांनी आज त्यांच्या केवळ चार महिन्यांच्या नातवाला 240 कोटी रुपयांच्या शेअर्समध्ये हिस्सा देऊन भारतातील सर्वात तरुण करोडपती बनवले आहे. मूर्ती यांच्या नातवाचे नाव एकग्रह मूर्ती आहे. या जबरदस्त भेटीनंतर त्याच्याजवळ इन्फोसिस कंपनीतील एकूण 15 लाख शेअर्स जमा झाले आहेत, म्हणजेच तो कंपनीतील 0.04 टक्क्यांचा भागीदार आहे.

आपण नेहमीच नारायण मूर्ती यांची मुलगी अक्षता मूर्ती हिच्याबद्दल चर्चा करतो, अक्षता ही इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची पत्नी आहे, मात्र तुम्हाला नारायण मूर्ती (Narayan Murthy) आणि सुधा मूर्ती यांच्या मुलाबद्दल माहिती आहे का? हो!! रोहन मूर्ती हा मूर्ती दाम्पत्याचा मुलगा असून मूर्ती कुटुंबाचा नातू म्हणजेच एकग्रह रोहन मूर्ती हा रोहन मूर्ती आणि अपर्णा कृष्णन यांचा मुलगा आहे आणि त्याचा जन्म नोव्हेंबर 2023 मध्ये झाला होता.