Narayana Murthy: भारत देशातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी म्हणजेच इन्फोसिस. इन्फोसिस आणि त्याचे मालक नारायण मूर्ती यांना ओळखत नाही असं क्वचितच कोणी भारतात असेल. नारायण मूर्ती हे त्यांच्या परखड मत मांडणीसाठी ओळखले जात आहेत. अलीकडेच त्यांनी भारत देशाचा विकास होण्यासाठी देशातील तरुणांनी आठवड्यातील 70 तास स्वतःला कामात झोकून दिलं पाहिजे असं विधान केलं होतं. चीन हा आपला बलाढ्य प्रतिस्पर्धी आहे, आणि त्याला मागे टाकायचं असेल तर मेहेनातीशिवाय पर्याय नाही असा एकंदरीत त्यांच्या म्हणायचा अर्थ लावला जाऊ शकतो. त्यांच्या या विधानानंतर देशभरातून अनेकांनी त्यांना प्रोत्साहन दिले किंवा त्यांची बाजू उचलून धरली. मात्र नारायण मूर्ती यांच्या मताचा विचार काल संसद भवनात करण्यात आला आहे. काय झाली एकूण चर्चा जाणून घेऊया…
विरोधी पक्षांनी विचारले सरकारचे मत:
Narayana Murthy यांच्या 70 तास तरुणांनी काम केले पाहिजे या विधानाला देशभरातून अनेकांनी उचलून धरलं असलं तरीही अद्याप भारत सरकारने यावर काहीही मत व्यक्त केलेलं नव्हतं. मात्र सोमवारी संसद भवनाच्या बैठकीत सरकारला विरोधी पक्ष नेत्यांनी यावर विचार प्रकट करायला सांगितले होते. केंद्रीय श्रम आणि रोजगार(राज्य) मंत्री रामेश्वर तेली यांनी सदर प्रश्नाचे उत्तर दिले. रामेश्वर यांच्या म्हणण्याप्रमाणे अद्याप सरकारने 70 तास काम करणे (70 hours Work) अश्या कोणत्याही प्रस्तावाचा विचार केलेला नाही. सदर प्रश्न विचारणाऱ्या तिन्ही विरोधी नेत्यांमध्ये कोमाटी व्यंकट रेड्डी(कॉंग्रेस), श्रीनिवास रेड्डी(भारत) आणि कुनुमुरू रघु राम कृष्ण राजू(YSRP) यांचा समावेश होता.
काय म्हणाले होते नारायण मूर्ती? Narayana Murthy
Narayana Murthy यांनी आधल्या महिन्यात केलेल्या “70 तास काम” (70 hours Work) या विधानाची चर्चा सर्वत्र केली जात आहे. द रीकोर्ड या कार्यक्रमात बोलताना नारायण मूर्ती यांनी हे मत मांडले होते. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे देशातील तरुणांनी दर आठवड्याला 70 तास काम करण्याची गरज आहे, तर आणि तरच देशाची अर्थव्यवस्था जगभरातील इतरांशी स्पर्धा करू शकते. मूर्ती म्हणतात कि जगाच्या तुलनेत आपली वर्क प्रोडक्टिव्हिटी फारच कामी आहे. आपला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी म्हणजे चीन, याला जर का मागे टाकायचं असेल तर देशातील तरुणांनी स्वतःला कामात झोकून दिलं पाहिजे. यासाठी त्यांनी जपान आणि जर्मनी यांचं उदाहरणही दिलं होतं.