Narayana Murthy On Working Hours : मागच्या काही दिवसांपासून Infosys या देशातील दुसऱ्या सर्वात मोठ्या IT कंपनीचे मालक नारायण मूर्ती फारच चर्चेत आहेत. त्यांनी देशातील तरुणांनी आठवड्यातून 70 टक्के काम करण्याची गरज आहे असे मोठे विधान केले होते. या विधानावर साहजिकपणे काही लोकांनी संमती दर्शविली तर अनेकांनी यावर टीकास्त्र सोडले. केवळ सामान्य लोकांमध्येच याची चर्चा होत नाही तर विरुद्ध पक्षाने देखील सरकारला “यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे?” असा थेट प्रश्न संसदेत विचारला होता. त्यामुळे नारायण मूर्ती यांच्या एका वक्तव्याने जनसामान्यांपासून ते सरकारपर्यंत सर्वांनाच विचार करायला प्रवृत्त केले आहे. आता पुन्हा एकदा याचाच विषयावर मूर्ती यांनी परखडपणे आपले मत व्यक्त केले आहे. यावेळी काय म्हणतायत नारायण मूर्ती पुन्हा एकदा जाणून घेऊया…
70 तास काम करण्यावर काय म्हणालेत नारायण मूर्ती? (Narayana Murthy On Working Hours)
इन्फोसिस या प्रमुख IT कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी त्यांच्या गतविधानाला जोडून आणखीन एक विधान केले आहे. तुम्ही आजूबाजूला चर्चा केली तर अधिकाधिक लोकं कामाच्या वाढत्या ताणामुळे त्रस्त आहेत हे तुमच्या लक्ष्यात येईल. दिवसभरातून 8 ते 9 तास काम करून जिथे कर्मचाऱ्यांचा शारीरिक तसेच मानसिक ताण वाढत आहे, तिथे नारायण मूर्ती यांनी कामाचे तास वाढवले पाहिजेत असा दिसलेला संदेश मंडळींना रुचणारा नाही (Narayana Murthy On Working Hours).
नारायण मूर्ती स्वतःचे उदाहरणात देत तरुणांना अधिक काम करण्याचा संदेश देतात. ते म्हणतात कि “कंपनी जेव्हा पहिल्या टप्प्यावर होती तेव्हा मी दर आठवड्याला 85 ते 90 तास काम करायचो. सकाळी 6:20 वाजता ऑफिसमध्ये जायचो तर रात्री 8:30 वाजता सर्व काम संपवून तिथून बाहेर पडायचो आणि याचे उत्तम फळ मला मिळाले आहे.” देशाला समृद्ध बनवायचं असेल तर मेहेनतीशिवाय पर्याय नाही. नारायण मूर्ती यांच्या म्हणण्यानुसार वयाच्या 40 वर्षांपेक्षा अधिक काळ त्यांनी 70 तास काम करण्यात घालवले आहेत. कधीकधी तर त्यांनी 85 ते 90 तास काम केल्याचा उल्लेखही केला आहे. नारायण मूर्ती यांच्या प्रस्तावाला अनेक उद्योगपती दुजोरा देत असले तरीही तरुणांच्या मनात हा प्रस्ताव रुचलेला दिसत नाही.
70 तास काम कारण्यावार काय म्हणतात तरुण मंडळी?
ऑक्टोबर महिन्यापासून देशभरात नारायण मूर्ती यांच्या वक्तव्याची चर्चा केली जात आहे, मात्र अधिकांश तरुण मंडळी मात्र त्यांच्या या मताशी सहमत नाहीत. सोशल मीडियाचा वापर करून ते आपली नाराजी व्यक्त करीत आहेत (Narayana Murthy On Working Hours). देशातील तरुणांच्या मते व्यवसायाचा मालक असणे आणि एक कर्मचारी म्हणून काम करणे या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत व त्यांची एकत्र सांगड घातली जाऊ शकत नाही. त्यांच्या मते नारायण मूर्ती हे स्वतः इन्फोसिसचे मालक आहे आणि म्हणून त्यांनी सर्वाधिक मेहनत घेणं हे साहजिक आहे. काही तरुणांनी याला टॉक्सिक वर्क कल्चर म्हटले आहे तर काही जणांच्या माते आयुष्यात सफल व्हायचं असेल तर अधिकाधिक मेहनत हि घ्यावीच लागते. जगभरातील श्रीमंत माणूस म्हणजेच एलोन मस्क हे देखील आठवड्याला 100 ते 110 तास काम करतच होते.