Narayana Murthy : Infosys ही भारतातील दुसरी सर्वात मोठी IT कंपनी आहे. आणि Infosys चे मालक म्हणजेच नारायण मूर्ती हे नेहमीच त्यांच्या रोखठोक वक्तव्यामुळे सर्वत्र ओळखले जातात. काही दिवसांपूर्वी त्यांनी देशातील तरुणांना 72 तास काम करण्याचा सल्ला दिला होता व या सल्ल्याला त्यांनी स्वतःच्या उदाहरणाची जोड दिली होती. केवळ मेहनतीच्या जोरावरच माणूस तसेच कोणताही देश प्रगती करू शकतो हा त्यांच्या म्हणण्याचा मतितार्थ होता. नुकतंच नारायण मूर्ती त्यांनी पत्नी सुधा मूर्ती यांच्या बद्दल देखील एक खास वक्तव्य केले, ज्यात नारायण मूर्ती असं म्हणत की सुधा मूर्ती या नेहमीच त्यांच्या आणि कंपनीच्या इतर सह संस्थापकांच्या तुलनेत इन्फोसिस सांभाळण्यासाठी अधिक सक्षम होत्या, मात्र त्यांनी चुकीच्या विचारसरणीला कवटाळल्यामुळे नेहमीच त्यांनी सुधा मूर्तींना व्यवसायापासून दूर ठेवले. सुधा आणि नारायण मूर्ती यांची मुलगी म्हणजेच अक्षता मूर्ती जी ब्रिटनच्या पंतप्रधानांची पत्नी आहे. तिच्या बालपणात देखील वडील तिला जास्ती वेळ देऊ शकत नसत, तुम्हाला कामात सतत व्यस्त असणाऱ्या नारायण मूर्ती आणि त्यांची मुलगी अक्षता यांच्यातील ‘हा’ प्रसंग माहिती आहे का?
काय आहे अक्षता आणि Narayana Murthy यांच्यातला रंजक प्रसंग?
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी शूनक यांच्या पत्नी अक्षता मूर्ती ही लहानपणी तिच्या आजोबांना आपल्या खरे वडील (Real Dad) समजायची, तर नारायण मूर्ती यांना Bonus Dad असं म्हणायची. याचं प्रमुख कारण होतं नारायण मूर्ती यांची व्यस्त जीवनशैली. नारायण मूर्ती नेहमीच कामात व्यस्त असायचे व कधीतरी अधून मधूनच मुली सोबत मजा मस्ती करत वेळ घालवत असत. नारायण मूर्ती यांची मुलगी सुद्धा त्यांच्याप्रमाणे रोखठोक आहे, एके दिवशी तिने नारायण मूर्ती यांना विचारलं होतं की, “तुम्ही सर्वात जास्त प्रेम कोणावर करता; तुमची मुलगी अक्षता हिच्यावर की कंपनी इन्फोसिसवर?”. यावर आश्चर्याने थक्क झालेल्या नारायण मूर्तींनी उत्तर दिलं होतं की, “मी तुम्हा दोघांवरही समान प्रेम करतो”. नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती हे नेहमीच आपल्या जीवन प्रवासाबद्दल उघड उघडपणे वक्तव्य करतात ज्यामुळे देशातील तरुणांना प्रेरणा मिळते.
नारायण मूर्ती यांचे जीवन इन्फोसिसला समर्पित आहे:
नारायण मूर्ती यांचे संपूर्ण आयुष्य एक अर्थाने इन्फोसिस या कंपनीला समर्पित आहे. ते दिवसातील अधिकाधिक वेळ हा कंपनीच्या कामात घालवायचे. कंपनी अधिकाधिक प्रगती व्हावी म्हणून त्यांनी संपूर्ण वेळ कंपनीच्या कामात देऊ केला होता. नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्या पत्नी सुधा मूर्ती या पेशाने शिक्षिका होत्या व या दोघांना रोहन आणि अक्षता अशी दोन मुलं आहेत. वडील कामात सतत व्यस्त असल्यामुळे नेहमीच मुलांना त्यांची कमतरता जाणवायची. नारायण मूर्ती यांनी स्वतः दिलेल्या कबुलीनुसार ते स्वतः चाळीस वर्षांपर्यंत दर आठवड्याला 70 तास पेक्षाही जास्त काम करायचे. त्याच्या म्हणण्यानुसार सकाळी 6:20 वाजता ऑफिसमध्ये जाणारे नारायण मूर्ती हे रात्री 8:30 वाजता घरी परतत असत, तसेच आठवड्याच्या सहाही दिवस काम करीत असायचे. त्यांच्या या वर्कहॉलीक नेचर मुळे कंपनी आज उंच शिखर गाठू शकली आहे व आपली मेहनत ही अजिबात वाया गेलेली नाही याबद्दल त्यांना आनंद वाटतो.