Narayana Murthy : इन्फोसिस (Infosys) आपल्या देशातील आघाडीवर काम करणारी एक IT कंपनी आहे. Infosysया कंपनीमध्ये काम मिळवण हे अनेक तरुणांचं स्वप्न असतं, आज आपण जाणून घेऊया या कंपनीचे सर्वेसर्वा म्हणजेच नारायण मूर्ती त्यांना देशातील तरुणांकडून नेमक्या काय अपेक्षा आहेत. जसं की आपण सगळेच जाणतो की आपल्या देशात जगाच्या तुलनेत सगळ्यात जास्त युवा वर्ग आहे, हल्लीच नारायण मूर्ती यांनी आपल्या एका मुलाखतीत तरुणांकडून त्यांच्या असलेल्या अपेक्षांबद्दल चर्चा केली आहे. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे भारतात सर्वात जास्त तरुण वर्ग असून देखील आपली उत्पादन क्षमता ही अजूनही कमी आहे, आणि ही उत्पादन क्षमता वाढवण्यासाठी तरुणांनी दररोज निदान 12 तास काम करणे गरजेचे आहे असे त्यांनी म्हंटल आहे.
काय म्हणाले नारायण मूर्ती : Narayana Murthy
नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांची अपेक्षा आहे की देशातील तरुणांनी निदान 12 तास तरी काम करावे. आपल्या देशात असलेली तरुणांची संख्या खरोखरच आपली सर्वात मोठी ताकद म्हणावी लागेल तरीही आपल्याकडून अपेक्षित दर्जाचे काम होत नसल्यामुळे उत्पादन क्षमता इतरांच्या तुलनेत अजूनही कमीच आहे. नारायण मूर्तींच्या म्हणण्याप्रमाणे भारताला जर का आर्थिक दृष्ट्या अव्वल करायचे असेल तर देशातील तरुणांनी जास्तीत जास्त काळ हा कामात गुंतवणे गरजेचे आहे. दुसऱ्या विश्व युद्धानंतर जापान आणि जर्मनी या देशांनी जसे पुनरागमन करून दाखवले प्रमाणे खूप पावलं उचलत आणि परिश्रम करण्याची तरी आपण दाखवली पाहिजे. असे जर का केले तर आणि केवळ तरच आपण चीन सारख्या आपल्या प्रतिस्पर्धी देशाला मागे टाकू शकतो.
भ्रष्टाचारा कमी आणि काम वाढले पाहिजे:
नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांच्यामते, आपल्या देशातील अर्थव्यवस्था पोखरणारी सर्वात मोठी कीड म्हणजे भ्रष्टाचार आहे. देशातील काना- कोपऱ्यात अजूनही भ्रष्टाचार केला जातो, छोटे छोटे निर्णय घेण्यासाठी सरकारी कर्मचारी बराच वेळ दवडतात. आपल्याला जर का या जगाच्या पाठीवर पुन्हा एकदा राज्य करायचे असेल अशा गोष्टींना वेळीच मागे सारणे महत्त्वाचे आहे. नारायण मूर्ती यांनी देशातील युवकांना जास्तीत जास्त काळ कामात गुंतवण्याची विनंती केली आहे, ते म्हणतात की मी स्वतः जर का आठवड्यातून 70 तास काम करू शकतो तर देशातील प्रत्येक तरुणांकडून सुद्धा ही गोष्ट नक्कीच साध्या होण्यासारखी आहे.
जोपर्यंत कामाप्रती आवड आणि निष्ठा वाढवत नाही, तोपर्यंत केवळ राज्य करणाऱ्या सरकारकडून अपेक्षा ठेवून चुकीचा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. ते म्हणतात की 300 वर्षानंतर आपण पुन्हा एकदा प्रगतीच्या मार्गावर चालत आहोत, ही प्रगती कायम ठेवत दिवसेंदिवस त्यांच्या तुलनेत अव्वल व्हायचे असेल देशातील तरुण पिढीने स्वतःला कामाप्रती झोकून दिले पाहिजे. देशातील प्रत्येक तरुण जर का पुढच्या वीस ते पन्नास वर्षांसाठी कृषी बारा तास काम करायला तयार असेल तर आपली आर्थिक दृष्ट्या वाढ होऊ शकते.