बिझनेसनामा ऑनलाईन : अलीकडेच Infosys चे मालक नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी देशातील युवकांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला दिला होता. आपल्या देशाची खरी ताकद असलेला हाच युवा वर्ग आपल्याला जगावर राज्य करण्यासाठी मदत करू शकतो असे त्यांचे म्हणणे होते. या त्यांच्या महत्वाच्या वक्तव्यावर अनेक जाणकारांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. आता पुन्हा एकदा नारायण मूर्ती यांनी अजून एका विषयासंदर्भात महत्वाचे वक्तव्य केले आहे, भारतात शिक्षक वर्ग सर्वात मोठा आहे आणि नारायण मूर्ती यांनी याच शिक्षकांना मिळणाऱ्या पगाराबद्दल आपले म्हणणे व्यक्त केले आहे.
काय म्हणाले नारायण मूर्ती (Narayana Murthy)
भारतात शिक्षकी पेशा अनेक लोकं स्वीकारतात आणि साधारणतः आपली अशी समजूत असते कि शिक्षकांना इतर कर्मचाऱ्यांच्या तुलनेत सर्व प्रकारच्या सोयी व सुविधा दिल्या जातात तसेच आर्थिक दृष्ट्या सुद्धा हा एक सुखी व्यवसाय आहे. मात्र या व्यवसायाबद्दल बोलताना इन्फोसिसचे मालक नारायण मूर्ती म्हणाले कि आपण भारतात शिक्षकांना आदर देतोच पण याच सोबत त्यांना मिळणारा पगारही त्याच तोडीचा असला पाहिजे.एक शिक्षक हा अनेक मुलांना घडवत असतो आणि हीच मुलं पुढे जाऊन आपल्या देशाचे भविष्य ठरवणार असतात. त्यामुळे शिक्षक बनणं हि केवळ एक नोकरी नसून आपल्या देशाचे भविष्य घडवण्यासाठी केलेली तडजोड आहे. इन्फोसिसकडून वर्ष 2009 पासून अश्या शिक्षकांना बढावा देण्यासाठी एक पुरस्कार देखील सुरु करण्यात आला आहे असं ते म्हणाले.
शिक्षणाचा दर्ज्या वाढवण्यासाठी हे करा:
देशातील शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलताना नारायण मूर्ती म्हणाले कि देशात नेशनल एज्युकेशन पोलिसीच्या अंतर्गत विविध राज्यांमधून आणि जगभरातून 10,000 सेवानिवृत्त शिक्षकांच्या मदतीने ट्रेन द टीचर या योजनेची सुरुवात झाली पाहिजे. नारायण मूर्ती (Narayana Murthy ) म्हणतात कि केवळ 4 योग्य प्रशिक्षक मिळून प्राथमिक शाळेतील 100 आणि माध्यामिक शाळेतील 100 शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी सक्षम आहेत. याचा जर का आपण योग्य आराखडा तयार केला तर दर वर्षाला प्राथमिक विद्यालयातून 2,50,000 आणि माध्यमिक विद्यालयातून 250,000 शिक्षकांना प्रशिक्षण दिलं जाऊ शकतं. आणि येणाऱ्या पाच वर्षात हेच शिक्षक स्वतः प्रशिक्षक देखील बनू शकतात. शेवटी ते म्हणतात कि आपला देश 50 अरब अमेरिकी डॉलर्सची अर्थव्यवस्था बनवण्याच्या मार्गावर असताना दरवर्षी सेवा निवृत्त शिक्षकांवर 1,00,000 अमेरिकी डॉलर्स खर्च करणे आपल्यासाठी जास्त कठीण काम नाही.