NBCC Share Price । NBCC India Ltd या कंस्ट्रक्शन कंपनीचं नाव तुम्ही ऐकलं असेल. या कंपनीच्या शेअर्समधी चांगलीच वाढ झाली आहे. आज म्हणजेच गुरुवार दिनांक 19 ऑक्टोबर रोजी कंपनीच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळतेय. BSE वर 66.70 रुपये आणि NSE वर 66.60 रुपयांसह या कंपनीचा व्यवहार सुरु आहे. आता मिळालेली ताजी बातमी जर का आपण पहिलीत तर आज दुपारी या भावांमध्ये 8 टक्क्यांची तेजी पाहायला मिळाली. काल BSE वर या शेअर्सची किंमत 64.63 रुपये तर NSEवर 64.60 रुपये होती. मात्र आज या कंपनीच्या शेअर्समध्ये जोमाने वाढ झालेली पाहायला मिळते. आज दुपारी 1 वाजेपर्यंत हे शेअर्स 69 रुपयांवर व्यवहार करीत होते.
कंपनी व्यवहार जोमात : NBCC Share Price
गेले सहा महिने मागे जाऊन जर का आपण पाहिलंत तर कंपनीचा व्यवहार अगदी जोमात सुरु आहे. मागच्या सहा महिन्यांमध्ये या शेअर्समध्ये 65 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झालेली आहे. या अर्थी वर्षात कंपनीला अधिकाधिक फायदा झाला आहे. यंदा आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत, म्हणजेच एप्रिल ते जून महिन्यांपर्यंत कंपनीने 77.41 करोड रुपयांचा नफा कमावला आहे. एकंदरीतच त्यांचे भांडवल 1,965.80 करोड रुपये आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत खरोखरच यंदा कंपनीने अधिक मेहनत घेत अधिकाधिक फायदा करवून घेतला, कारण गेल्या वर्षी कंपनीच्या एकूण भांडवलाचा आकडा 1,853.24 करोड रुपये होता.
कसा झाला कंपनीला फायदा?
कंपनीच्या शेअर्समध्ये अचानक तेजी येण्याचं कारण म्हणजे विशाखापाटनम येथून मिळालेली एक मोठी ऑर्डर आहे. इथून कंपनीला तब्बल 80 करोड रुपयांची ऑर्डर मिळाली आहे. विशाखापटनाम हे समुद्राच्या किनारी असल्यामुळे तिथे अनेक बंदरं पाहायला मिळतात. इथेच एका बंदरावर एका इमारतीच्या बांधकामाची ऑर्डर NCBI ला मिळाली आहे. कंपनीच्या शेअरवाढीमध्ये (NBCC Share Price) केवळ या एकाच ऑर्डरचा समावेश नाही, तर काही दिवसांपूर्वी कंपनीला मुंबईहून 25.19 करोड रुपयांची एक मोठी ऑर्डर मिळाली होती, हि ऑर्डर मध्यप्रदेश येथे एक काम्पोजिट रिजनल सेंटर बांधण्याबद्दल होती.