New Age Gold : सोन्याच्या खरेदीसोबत पैसे वाचवण्याची उत्तम संधी

New Age Gold: गेला महिना हा दिवाळी आणि दसऱ्याच्या सणामुळे धकाधकीचा आणि धावपळीचा ठरला. घरात सणसमारंभ असणं म्हणजेच प्रत्येकाची धाव ही सोनाराचा दुकानाकडे जातेच. त्यामुळे गेल्या महिन्यात धनत्रयोदशी, पाडवा, भाऊबीज अशा सणांच्या नावाखाली आपल्यापैकी अनेक जणांनी सोन्या चांदीची खरेदी केलीच असेल. गेल्या आठवड्यात देवउठणी एकादशी पार पडली, आणि आपल्या मराठी घरांमध्ये यानंतर तुळशीच्या लग्नाला सुरुवात होते, तुळशीच्या लग्नानंतर येतो तो लग्नाचा समारंभ. अशा लग्नसराईत स्वाभाविकपणे सोनारांच्या दुकानाबाहेर मोठमोठ्या रांगा लागणारच आहेत. आज सोन्याच्या खरेदी बाबत आम्ही तुम्हाला एक वेगळाच पैलू उलघडून दाखवणार आहोत, हा नेमका पैलू कुठला जाणून घेऊया…

न्यू एज गोल्ड (New Age Gold) म्हणजे काय?

बऱ्याचदा सोन्याची खरेदी ही दागिन्यांच्या स्वरूपात केली जाते. सध्या बाजारात सोन्याच्या किमती या वाढत असल्यामुळे अनेक घरांमध्ये ताण तणावाची परिस्थती निर्माण झाली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की सोन्याच्या खरेदीवर सुद्धा आपण पैशांची बचत करू शकतो. सोन्याची खरेदी आणि सोबतच पैशांची बचत म्हणजेच स्वाभाविकपणे आपला आनंद हा द्विगुणीत होणार यात काहीही शंका नाही. मग आता ही गोष्ट कशी साध्या करावी हे जाणून घेऊया.

सोन्याचे 2 प्रकार असतात, फिजिकल गोल्ड आणि डिजिटल गोल्ड. सोन्याच्या दुकानात जाऊन दागिन्यांची खरेदी करताना आपण अनेक वेळा जुने दागिने विकून त्यातूनच नवीन खरेदी करतो आणि अशा परिस्थितीत अतिरिक्त रकमेचा विचार केला जात नाही. सोन्याची खरेदी ही फिजिकल किंवा डिजिटल यांपैकी कोणत्याही एका माध्यमातून केली जाते, आणि त्यावर GST लागू होतो, हा कर भरणे प्रत्येक ग्राहकासाठी अनिवार्य आहे. त्यामुळे आज जाणून घेऊया की न्यू एज गोल्ड(New Age Gold) म्हणजे नेमकं काय? न्यू इस गोल्ड म्हणजेच सोन्यासारख्या दिसणारे सोन्यासारखे वाटणारे मात्र सोन्याच्या किमतीपेक्षा स्वस्तात मिळणारे डेमी फाईन गोल्ड दागिने होय.

या डेमी दागिन्यांचे फायदे कोणते?

एकतर ही डॅमेज ज्वेलरी परवडणाऱ्या दरात आणि वेगवेगळ्या आकारांमध्ये आणि डिझाईन्समध्ये बाजारात उपलब्ध आहे. आजकाल तरुण पिढीला आवडणारे दागिने हे जुन्या पिढीला आवडत नाहीत आणि जुन्या पिढीची पसंती ही तरुण पिढीच्या मनात येत नाही, त्यामुळे अशावेळी डॅमी दागिने मदत करू शकतात. हे दागिने कशा प्रकारे बनवले जाते माहिती आहे का? हे दागिने बनवताना त्यात मौल्यवान धातू आणि खड्यांपेक्षा अगदी स्वस्त पण दीर्घकाळ टिकणारा स्टर्लिंग सिल्वर याचा मेटल बेस म्हणून वापर करण्यात येतो व त्यावर गोल्ड प्लेटिंग करून त्याचे दागिन्यात रूपांतर केले जाते. सध्या या दागिन्यांची लोकप्रियता वाढत चाली आहे.

पारंपारिक मार्गांपेक्षा थोड्या वेगळा मार्ग निवडत आजकालची तरुण पिढी या दिशेने वळली आहे, ते काय करतात तर अशा प्रकारचे डेमी फाईन दागिने विकत घेतात आणि राहिलेले पैसे गोल्ड बॉंडच्या स्वरूपात गुंतवतात. डेमी फाईन दागिन्यांचा विशेष फायदा म्हणजे निष्चिंतता. एखादा दागिना घालून बाहेर पडायचं म्हणजे तो चोरीला जाईल का अशा प्रकारे अनेक शंका मनात घर करून असतात. एखादा दागिना रोज वापरल्याने खराब होऊन जाईल का, त्यात कुठल्याही त्रुटी आढळून येतील का अशा प्रकारच्या चिंतांनी मन भांबावून जातं. पण जर का तुम्ही डेमी फाईन दागिन्यांचा वापर करत असाल तर कोणत्याही प्रवासाय तुम्हाला त्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न सतावत नाही, अगदी दररोज वापर केल्यानंतर सुद्धा हे दागिने खराब होत नाहीत. त्यामुळे तुम्ही गुंतवलेल्या पैशांची जर का योग्यपणे परतफेड झालेली बघायचे असेल तर नक्कीच न्यू एज गोल्ड(New Age Gold) विकत घ्या.