New Changes in April: येत्या दोन दिवसात नवीन आर्थिक वर्ष सुरू होईल आणि नवीन आर्थिक वर्षात अनेक महत्वाचे बदल होणार आहेत. आपल्या देशात होणारे बदल नक्कीच देशातील प्रत्येकावर परिणाम करणारे असतात त्यामुळे या एप्रिल महिन्यामध्ये होणाऱ्या 6 महत्त्वपूर्ण आर्थिक बदलांबद्दल जाणून घेणे तुमच्यासाठी आवश्यक आहे. हे बदल तुमच्या खिशावर निश्चितच परिणाम करतील, त्यामुळे त्याबद्दल जागरूक असणे गरजेचे आहे.
नवीन आर्थिक वर्षात घडणारे बदल कोणते? (New Changes in April)
1) NPS मध्ये आधार कार्ड अनिवार्य: एप्रिल 1 पासून होणाऱ्या अनेक बदलांमधला सर्वात महत्वाचा बदल NPS च्या बाबतीत असेल. NPS (National Payment System) मध्ये लॉग इन करण्यासाठी आता आधार कार्ड आधारित दुहेरी पडताळणी (2FA) आवश्यक असेल. हे तुमचे NPS खाते अधिक सुरक्षित करेल.
2) SBI क्रेडिट कार्डच्या बाबतीत बदल: नवीन आर्थिक महिन्यापासून होणाऱ्या बदलांमध्ये आणखीन एक महत्वाचा बदल ठरतो तो म्हणजे SBI कार्डचे नियम. एप्रिल 15 पासून, SBI च्या काही निवडक क्रेडिट कार्ड्सवर भाड्याच्या पेमेंटवर रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत.
3) Yes Bank आणि ICICI Bank क्रेडिट कार्डवर फायदे: आता नवीन नियमांनुसार YES Bank च्या क्रेडिट कार्डवर तिमाहीत 10,000 रुपये किंवा यापेक्षा जास्त खर्च केल्यास तुम्हाला मोफत देशांतर्गत विमान कर्ज मिळेल तसेच ICICI Bank च्या क्रेडिट कार्डवर तिमाहीत 35,000 पेक्षा जास्त खर्च केल्यास विमानतळाच्या लाउंजची सुविधा मिळेल.
4) Axis Bank क्रेडिट कार्डवर रिवॉर्ड बंद: एप्रिल 20 पासून, Axis Bank च्या क्रेडिट कार्डवर इंधन, विमा आणि सोन्यावर खर्च केल्यास रिवॉर्ड पॉइंट मिळणार नाहीत.
5) Ola Money Wallet मध्ये जमा रकमेची मर्यादा: अनेक महत्वाच्या बदलांमधील आणखीन एक बदल म्हणजे एप्रिल 1 पासून Ola Money मध्ये एका महिन्यात जास्तीत जास्त 10,000च जमा करता येतील आणि ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे.
6) Fastag KYC अनिवार्य: National Highway Authority of India (NHAI) ने Fastag KYC अनिवार्य केले आहे. 31 मार्चपर्यंत तुमचे Fastag KYC अपडेट न केल्यास, एप्रिल 1 पासून तुम्हाला Fastag वापरण्यात अडचण येऊ शकते.
हे सर्व घटक तुमच्या दैनंदिन जीवनात महत्वचा बदल घडवून आणू शकतात(New Changes in April) म्हणूनच या बदलांबाबत जागरूक राहून तुम्ही तुमच्या आर्थिक व्यवहारांचे योग्य नियोजन करावे.