New Financial Rules: फेब्रुवारी महिन्याची खासियत काय आहे? अर्थात येणारं बजेट. पण बजेटच्या नादात काही महत्वाच्या निर्णयांबद्दल अजिबात विसरू नका, कारण येत्या नवीन महिन्यात अनेक आर्थिक नियम बदलणार आहेत आणि एक सुजाण नागरिक म्हणून याची माहिती तुम्हाला असलीच पाहिजे. आज आम्ही तुम्हाला याच महत्वाच्या निर्णयांबद्दल माहिती देणार आहोत जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही. याची माहिती तुम्हाला का असावी? कारण याचा थेट परिणाम तुमच्या नियोजनावर होणार आहे, आता हे बदल जाणून घेण्यासाठी तुमच्या हातात एकाच दिवस बाकी असला तरीही याकडे दुर्लक्ष्य करू नका.
१) NPS मधून पैसे काढणे: पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी (Pension Fund Regulatory And Development Authority, PFRDA) कडून १२ जानेवारी रोजी पेन्शनचे आंशिक पैसे काढण्यासाठी आणि कायद्याचे पालन करण्याची हमी देण्यासाठी एक मास्टर परिपत्रक जारी करण्यात आली होती, ज्याची अंमलबजावणी 1 फेब्रुवारीपासून केली जाईल. नवीन नियमांनुसार आता NPSचे खातेधारक नियोक्ता योगदान वगळता केवळ 25 टक्क्यांपर्यंत रक्कम काढू शकणार आहेत. मात्र लक्ष्यात घ्या की इथे तुमच्या नावावर अगोदरच एखादं घर असेल तर तुम्ही NPS मधून रक्कम काढू शकणार नाही.
२) IMPSचे नियम: नवीन महिन्याच्या सुरुवातीपासूनच इमिजिएट पेमेंट सर्व्हिस म्हणजेच (Immediate Payment Services, IMPS) मध्ये मोठा बदल होणार आहे. या नवीन नियमानुसार आता तुम्ही लाभार्थीचे नाव न जोडता थेट बँक खात्यांमध्ये 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम हस्तांतरित करू शकता. बँक खात्यातील व्यवहार जलद गतीने व्हावेत, कोणाचा वेळ फुकट जाऊ नये आणि या व्यवहारांवर अचूक निर्बंध बसावेत म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे(New Financial Rules).
३) FasTag ला KYC ची जोड हवीच: नवीन बदलानुसार आता तुमच्या वाहनाच्या FasTag वर KYC असणे आवश्यक असणार आहेत. देशातील सर्वोच्य बँकेच्या आदेशानुसार 1 फेब्रुवारीपासून ज्या FasTag खात्यांना KYCची जोड नाहीत अशी खाती त्वरित निलंबित केली जाणार आहेत. अलीकडेच एका वाहनावर अनेक FasTag असल्याच्या किंवा KYC शिवाय फास्टॅग जारी केल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या, आणि त्यानंतरच आता हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
४) LPGचे दर बदलणार: नवीन महिन्यात होऊ शकणारा हा बदल देशातील महिला वर्गाला खुश करू शकतो, कारण काही जणांच्या मते आता LPG सिलिंडरच्या किमती बदलण्याची शक्यता आहे. देशात लवकरच लोकसभेच्या निवडणूका होणार असल्याने कदाचित कार्यरत सरकारकडून सिलिंडरच्या किमती बदलल्या जाऊ शकतात.
५) SBI होम लोन: स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) द्वारे चालवली जात असलेली विशेष गृह कर्ज मोहीम 31 जानेवारी 2024 रोजी संपणार आहे. या मोहिमे अंतर्गत, बँकेचे ग्राहक गृहकर्जावर 65 bps पर्यंत सूट मिळवू शकतात आणि ही सूट सर्व गृहकर्जांसाठी वैध असेल. ग्राहकांना गृहकर्जाची रक्कम, कर्जाचा कालावधी आणि व्याजदर यावर आधारित सूट मिळेल. उदाहरणार्थ, जर अर्जदाराला 750 CIBIL स्कोर असेल आणि तो 20 वर्षांच्या कालावधीसाठी 10 लाख रुपयांचे गृहकर्ज घेत असेल, तर त्याला 65 bps पर्यंत सूट मिळेल. याचा अर्थ असा की त्याला 7.20% व्याजदर ऐवजी 6.55% व्याजदर भरावा लागेल.