New UPI Rules । जगभरात सर्वात जास्त UPI पेमेंटचा वापर भारतात होत आहे. UPI मुळे खरोखर जीवन सोपं झालं आहे. देशातील कानाकोपऱ्यातील छोट्या मोठ्या दुकानांमध्ये एकमेकांना पैसे पाठ्वण्यासाठी UPI चा वापर करण्याची संधी उपलब्ध करून दिली जाते आणि डिजिटल इंडिया बनण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल म्हणावं लागेल, मात्र UPIचा वापर करणाऱ्या ग्राहकांसाठी आजची हि बातमी फारच महत्वाची आहे, कारण नेशनल पेमेंट कॉरर्पोरेशन ऑफ इंडियाकडून नवीन नियम जारी करण्यात आलेले आहेत. त्यानुसार काही लोकांची UPI ID बंद पडू शकते. चला तर मग याबाबत सविस्तर जाणून घेऊयात.
UPI बद्दलची नविन माहिती काय सांगते: (New UPI Rules)
आज काल लोकं छोट्या मोठ्याआर्थिक कामांसाठी UPIचा वापर केला जातो आणि या नवीन पद्धतीमुळे आपले जीवन काही अंशी सोपं झालं आहे. मात्र आता भारत सरकारकडून काही नियम बदलल्यामुळे तुम्हाला याची माहिती असणे महत्वाचे आहे कारण अन्यथा पुढच्यावेळी तुमाच्याद्वारे केलेलं UPI पेंमेंट यशस्वी होणार नाही. 7 नोव्हेंबर 2023 रोजी नेशनल पेमेंट कॉरर्पोरेशन ऑफ इंडियाने अशी बातमी जारी केली आहे कि जर का तुम्ही गेल्या वर्षापासून PhonePay, GooglePay, PayTM यांसारख्या एपचा वापर करत नसाल तर तुमची UPI आयडी रद्ध केली जाईल आणि त्यानंतर कधीच तुम्ही UPIचा वापर कुठल्याच आर्थिक घडामोडींमध्ये करू शकणार नाहीत(New UPI Rules).
त्यामुळे सर्वात आधी तुमच्या मोबाईल नंबर सोबत जोडलेल्या एपचा वापर करून कोणता आर्थिक व्यवहार झाला आहे का याची तपासणी होईल, सरकारने यासाठी 31 डिसेंबर 2023 पर्यंतचा अवधी दिलेला असून या तारखेपर्यंत तुम्ही काहीच पाउल चालले नाही तर नवीन वर्षात तुम्ही UPI चा वापर करू शकणार नाही. UPI च्या माध्यमातून एकमेकांना पैसे पाठवत असताना हे सर्व आर्थिक व्यवहार अधिक सुरक्षित व्हावे यासाठी NPCI कडून हे पाऊल उचलण्यात आलं आहे.