New Year Investment Plan : आज-काल महागाईच्या जीवनात तग धरून राहायचं असेल तर हातात पैसे असणं फारच महत्वाचं आहे. सामान्य माणसाला अगदी किरकोळ गरजा भागवण्यासाठी सुद्धा दर महिन्याला किमान 10 हजार रुपयांचा खर्च हा नक्कीच करावा लागतो. हातात नोकरी तर असते पण वाढती महागाई तो पैसा काही मनसोक्तपणे वापरण्याची मुभा देत नाही. गुंतवणुकीचे अनेक पर्याय उपलब्ध असूनही सामान्य माणूस भविष्यासाठी हवी तेवढी गुंतवणूक करण्यात असमर्थ ठरतो. कष्टाने कमावलेला पैसा हा आपल्या उपयोगात यावा अशी प्रत्येकाचेच इच्छा असते, मग अशावेळी सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती? तर ती म्हणजे पैशांचे योग्य नियोजन करणे. तुम्ही बाजारातील परिस्थितींचा योग्य अभ्यास करून जर का पैशांचे नियोजन केले तर नक्की आर्थिक चणचणींपासून दूर राहणे शक्य आहे.
पैशांचे नियोजन महत्वाचे आहे का?
अवघ्या 3 दिवसांतच आपण नवीन वर्षात प्रवेश करू. प्रत्येक वर्षाचे स्वतःची अशी एक खासियत असते, या 365 दिवसांत आपल्या आयुष्यात वेगवेगळे बदल घडत असतात आणि दरवर्षी आपण नवीन वर्षात परिस्थिती सुधारू असा विचार करून जुन्या वर्षाला पूर्णविराम देत असतो. वर्षाच्या सुरुवातीला केलेल्या या निश्चयाचा काही काळातच विसर पडल्याने राहिलेलं संपूर्ण वर्ष पुन्हा एकदा कष्टकरी बनून राहतं. अनेक विचारवंतांच्या मते वेळ हि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, एकदा का वेळ हातातून निघून गेली की पुन्हा झालेली चूक सुधारता येत नाही. तुम्ही जर का प्रायव्हेट सेक्टर मध्ये नोकरी करत असाल तर नक्कीच वेळेचे भान ठेवून भविष्याच्या दृष्टीने तरतूद केली पाहिजे (New Year Investment Plan). अजूनही जर का पैशांच्या नियोजना बाबतीत विचार केलेला नसेल तर घाबरू नका कारण, वेळ अजून सरलेली नाही. योग्य नियोजनाने वाढत्या महागाईचा सामना केला जाऊ शकतो आणि यातूनच तुमचं येणार भविष्य सुखकर बनवलं जाऊ शकतं.
दर महिन्याला 5000 साठवून श्रीमंत बना: (New Year Investment Plan)
आज आम्ही तुम्हाला कमीत कमी पैशांच्या गुंतवणुकी मधून कसा मोठा फायदा कमावला केला जाऊ शकतो याबद्दल माहिती देणार आहोत. कुठल्याही मध्यमवर्गीय घरातील माणसाला 5000 रुपयांची मासिक गुंतवणूक ही काही मुश्किल नाही. त्यामुळे नक्कीच तुम्ही या कल्पनेचा विचार करावा. कधी तुम्ही म्युचल फंड या गुंतवणूक सेवेबद्दल ऐकलं आहे का? याच म्युच्युअल फंड्स मध्ये पाचशे रुपयांपासून गुंतवणुकीला सुरुवात करता येते. ही छोटीशी गुंतवणूक असल्यामुळे याला SIP म्हणजेच Systematic Investment Plan असं म्हणून ओळखलं जातं.
म्युचल फंड्स मध्ये पाच हजार रुपयांची 5000 जमा केल्यानंतर त्यावर दरवर्षी 15 टक्क्यांचा परतावा मिळवला जाऊ शकतो, याचाच अर्थ असा कि 22 वर्ष जर का तुम्ही ही गुंतवणूक सुरू ठेवली तर अंतिम क्षणी तुम्ही करोडपती बनलेले असाल. तसेच 17 टक्क्यांचा परतावा मिळवल्यास 5000 रुपयांच्या मासिक गुंतवणुकीवर तुम्ही म्युच्युअल फंड्स मधून 20 वर्षात 1.01 कोटी रुपये मिळवू शकता (New Year Investment Plan). वेळानुसार जर का गुंतवणूक वाढवली तर नक्कीच मिळणारा परतावा हा देखील अधिक असेल. आत्ता म्हणजे 2024 पासून या गुंतवणुकीला सुरुवात केल्यास 2040 पर्यंत तुम्ही एक कोटी रुपयांचे मालक झालेले असाल. आपल्या देशातील प्रत्येक नोकरदार माणूस हा किमान 25 ते 30 हजार रुपयांचे मासिक वेतन मिळवत असतो, त्यामुळे स्वाभाविकपणे तुम्ही नवीन वर्षात करोडपती बनण्याच्या गुंतवणुकीला सुरुवात करू शकता.