New Year Rules : नवीन वर्षात पदार्पण करण्याचा उत्साह आपल्या सर्वांच्या मनात निर्माण झालाय. आता केवळ दोन दिवसांचा अवधी बाकी राहिला असून आपण लगेचच 2024 या नवीन वर्षात प्रवेश करू. मात्र इथे हुरळून जाऊ नका, कारण नवीन वर्षांत संकटांचा सामना करायचा नसल्यास तुम्हाला काही गोष्टींची खबरदारी घ्यावी लागणार आहे. अगदीच साधं उदाहरण द्यायचं झाल्यास, प्रत्येक मोबाईल वापरकर्त्याला नवीन वर्षाच्या सुरुवातीला काही वेगळे नियम पाळावे लागणार आहेत. तुम्ही मोबाईलचा वापर करत आहात का? हो!! तर नवीन वर्षात प्रवेश करण्याआधी काही ‘या’ गोष्टींची दखल तुमच्याकडून घेतले गेली पाहिजे, कारण असे न केल्यास येणाऱ्या वर्षात तुम्हाला आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. घडून गेलेल्या वर्षात अनावधानाने आर्थिक निर्णय घेताना ज्या काही चुका झाल्या असतील त्या पुन्हा घडू नयेत व आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू नये म्हणूनच वर्षाच्या सुरुवातीला सरकारकडून जारी करण्यात आलेले हे नियम नीट तपासून घ्या….
प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी हि बातमी फारच महत्वाची आहे, कारण 1 जानेवारी 2024 पासून आपल्या देशात पाच मोठे बदल होणार आहेत. वेळ अगदी कमी असला तरी 31 डिसेंबर पूर्वी ही काम करून घेणं तुमच्यासाठी अनिवार्य आहे, कारण असे न केल्यास तुम्हाला यूपीआय पेमेंट करता येणार नाही तसेच सिम कार्ड देखील कायमचे ब्लॉक होऊन जाईल. मग हे मोठे बदल कोणते याबद्दल आज सविस्तर माहिती जाणून घेऊया.
वर्ष संपायच्या आत हे बदल नक्की जाणून घ्या: (New Year Rules)
तुमच्याकडून या वर्षभरात जर का UPI चा(UPI) वापर करण्यात आलेला नाही तर त्वरित UPI चा वापर सुरु करा, कारण वर्षाच्या शेवटी ज्या UPIअकाउंट वरून एकही आर्थिक काम केलेले आढळून येणार नाही ते अकाउंट 1 जानेवारी 2024 पासून कायमचे बंद केला जाईल. यानंतर तुम्ही गुगल पे, फोन पे, पेटीएम इत्यादी ऑनलाईन पेमेंट ॲप्सचा वापर करून यूपीआय पेमेंट करू शकणार नाही (New Year Rules). मोबाईल वापरकर्त्यांनी अजून एका गोष्टीची दखल वेळेत घेतली पाहिजे, ती म्हणजे आता नवीन सिम कार्ड विकत घेताना तुम्हाला बायोमेट्रिकचा तपशील द्यावा लागणार आहे. राज्यसभा आणि लोकसभेमध्ये हे विधेयक मान्य करण्यात आले असून लवकरच याचे कायद्यात रूपांतर होईल.
काही दिवसांपूर्वी गुगलने Gmail खात्यांच्या वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची बातमी जाहीर केली होती. ज्यामध्ये गेल्या एक-दोन वर्षांपासून वापरात नसलेली खाती कायमची बंद करून टाकण्याचा निर्णय देण्यात आला होता. हा नियम शाळा व व्यावसायिक खात्यांना लागू होत नसला तरीही प्रत्येक वैयक्तिक वापरकर्त्याला त्यांचा Gmail अकाउंट जिवंत ठेवण्यासाठी लवकरात लवकर तो ऍक्टिव्हेट करावा लागेल. सगळ्यात शेवटी वर्ष संपण्याच्या आत दखल घेण्यात यावा असा मोठा बदल म्हणजे रिझर्व बॅंक ऑफ इंडियाकडून लॉकरच्या कराराचे केलेलं नूतनीकरण(New Year Rules). नवीन वर्षापासून बँक मध्ये लॉकरच्या वापरावर नवीन नियम लागू केले जाणार आहेत, त्यामुळे तुम्हाला 31 डिसेंबर पर्यंत याला मंजुरी द्यावी लागेल अन्यथा यानंतर तुम्हाला लॉकरचा वापर करता येणार नाही.
शेवटी, महत्वाचा पण पाचवा बदल सांगतो कि डिमॅट खातेधारकाला 31 डिसेंबर पर्यंत नॉमिनीची माहिती अपडेट करणे अत्यावश्यक आहे. सप्टेंबर महिन्यात डिमॅट खातेधारकांना मुदतवाढ करवून देण्यात आली होती, ज्यात आता पुन्हा बदल होणे शक्य नाही. वरती नमूद केलेली ही सर्व कामे वर्ष संपण्याच्या आत पूर्ण करणे प्रत्येक नागरिकांसाठी बंधनकारक आहे. हे सर्व बदल आपल्या दैनंदिन जीवनात फार महत्त्वाची भूमिका बजावत असतात म्हणूनच वेळेत या सर्वांची दखल घेतली गेली पाहिजे.