Nifty And Sensex : शेअर बाजारातील प्रमुख घटक Nifty आणि Sensex आहेत तरी काय? जाणून घ्या सखोल माहिती

Nifty And Sensex : तुम्ही नेहमीच Nifty आणि Sensex ही नावं ऐकलेली असतीलच. बाजारी बातम्यांचा एकूण अंदाज घ्यायचा असेल तर Nifty आणि Sensex शिवाय पर्याय नाही. काही लेखांमध्ये तुम्ही गुंतवणूका, आणि शेअर बाजाराबद्दलही अनेक बातम्या वाचलेल्या असतीलच मात्र कधी Nifty आणि Sensex बद्दल सखोल माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का? Sensex वाढतो म्हणजे काय आणि त्याच्या आकड्यांमध्ये झालेली वाढ ही गुंतवणूकदारांसाठी महत्वाची का असते? प्रश्न अनेक असल्यामुळे आज याच विषयी सखोल माहिती जाणून घेऊया. NES म्हणजे राष्ट्रीय शेअर बाजार (National Stock Exchange of India Limited) आणि BSE म्हणजे मुंबई शेअर बाजार (Bombay Stock Exchange) हे आपल्या देशातील दोन प्रमुख शेअर बाजार आहेत. Sensex हा मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आहे तर Nifty हा राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक असतो. शेअर बाजाराची एकूण परिस्थिती काय आहे हे आपल्याला Nifty आणि Sensex च्या आकड्यांवरून ठरवता येते.

BSE आणि NSE मध्ये किती कंपन्यांचा समावेश होतो? (Nifty And Sensex)

मुंबई शेअर बाजारात 5 हजारांपेक्षा अधिक कंपन्यांची नोंदणी झाली आहे, तर राष्ट्रीय शेअर बाजारातील नोंदणी झालेल्या कंपन्यांचा आकडा जवळपास 1900 पर्यंत जातो. मात्र Sensex ची कामगिरी मोजण्यासाठी यांपैकी केवळ 30 कंपन्यांचा आधार घेतला जातो म्हणूनच Sensex मध्ये केवळ 30 कंपन्यांचा समावेश होतो. कंपन्याच्या शेअर्समधील चढ-उतारावरून Sensex वाढला की घटला हे ठरवले जाते, परिणामी Sensex ला BSE 30 किंवा BSE Sensex असंही म्हणतात.

या 30 कंपन्या भारतीय अर्थव्यवस्थेच्या विविध औद्योगिक क्षेत्रांचे प्रतिनिधित्व करतात, म्हणूनच यांमध्ये वित्तीय, वाहन, भांडवली वस्तू उद्योग, बँकिंग, तेल व वायू, माहिती तंत्रज्ञान, उर्जा, धातू व खाण, दूरसंचार या क्षेत्रातील कंपन्यांचा सेन्सेक्समध्ये समावेश होतो. कंपन्यांच्या शेअर्समध्ये होणाऱ्या चढ-उतारांवरून Sensex ची कामगिरी ठरते. इथे कंपन्या बदलत असल्या तरीही Sensex मधल्या शेअर्सची किंमत कायम तशीच राहते. दुसऱ्या बाजूला Nifty मध्ये 50 शेअर्सचा समावेश होतो आणि इथे कार्यरत असलेल्या 50 कंपन्यांची निवड 22 वेगवेगळ्या क्षेत्रांमधून केली जाते.