Nifty At All Time High: भारतातील प्रमुख 50 कंपन्यांचा समावेश असलेला Nifty-50 निर्देशांक आज सलग पाचव्या दिवशी वाढला आणि 22,157.90 च्या नवीन उच्चांकावर पोहोचला. या तेजीमुळे, National Stock Exchange (NSE) वरच्या सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजरी मूल्य(Mcap)4.65 ट्रिलियन डॉलरच्या विक्रमी पातळीवर पोहोचले आहे. गेल्या चार ट्रेडिंग सत्रांमध्ये Nifty-50 मध्ये सुमारे 2 टक्क्याची वाढ झाली आहे.
Nifty ने आज केलाय विक्रमी पराक्रम: (Nifty At All Time High)
फेब्रुवारी 2024 मध्ये आतापर्यंत Nifty-50 निर्देशांक 410 अंकांनी किंवा 1.92 टक्क्यांनी वाढला आहे. याचा अर्थ असा की, गुंतवणूकदारांनी या काळात चांगला परतावा मिळवला आहे. मार्च 2023 मधील 16,828 च्या नीचांकावरून निर्देशांक 31.60 टक्क्यांनी वाढला आहे, हे दर्शवते की बाजारपेठ मजबूत स्थितीत आहे. आज दुपारी 1:15 पर्यंत, Nifty Small Cap 100 Index आणि Nifty Midcap 100 Index दोन्ही अनुक्रमे 0.69 टक्के आणि 0.69 टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत होते.
आज मैदान गाजवणाऱ्या कंपन्या कोणत्या?
आजच्या ट्रेडिंग सत्रात, बजाज ऑटो, अदानी एंटरप्रायझेस, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज, मारुती सुझुकी इंडिया, अदानी पोर्ट्स आणि स्पेशल इकॉनॉमिक झोन, विप्रो आणि SBI लाइफ इन्शुरन्स यासह सात कंपन्यांच्या शेअर्सची किंमत 52 आठवड्यांच्या उच्चांकावर पोहोचली(Nifty At All Time High).