Niranjan Hiranandani In Mumbai Local । देशभरात रिटेल इंडस्ट्री टायकून म्हणून प्रसिद्ध असलेल्या निरंजन हिरानंदानी यांनी मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास केला. अनेक गाड्या आणि अपार श्रीमंती असलेल्या या माणसाने लोकल ट्रेनचा प्रवास का केला असेल? याचे उत्तर देखील त्यांनी इंस्टाग्रामवर व्हिडियो शेअर करताना दिले. सध्या कित्येक लोकं सोशल मीडियाचा वापर करत अनेक अतरंगी गोष्टी शेअर करत असतात. सामान्य घडामोडींपेक्षा एखादी वेगळी गोष्ट घडल्यास कुतूहलाने त्याकडे पाहिलं जातं आणि अधिकाधिक शेअर झाल्यामुळे ती गोष्ट ट्रेंडिंग बनते.
व्हिडियोमध्ये हिरानंदानी दिसतायत लोकल ट्रेनमध्ये: Niranjan Hiranandani In Mumbai Local
निरंजन हिरानंदानी यांनी स्वतः इंस्टग्रामचा वापर करून त्यांच्या लोकल ट्रेनचा प्रवास सोशल मीडिया फॉलोवर्स सोबत शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये 73 वर्षांचे हिरानंदानी बाकी प्रवाशांसह प्लॅटफॉर्मवर उभे आहेत, ट्रेनची वाट बघत असलेले हिरानंदानी एका कोचमध्ये बसून इतरांशी संवाद साधतात तसेच अनेकांशी हातमिळवणी करताना दिसतात. दरम्यान त्यांचे कर्मचारी त्यांच्या सोबत कायम तैनात असलेले पाहायला मिळतात (Niranjan Hiranandani In Mumbai Local).
या सोशल मीडिया पोस्टमध्ये मुंबईच्या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करण्याचं कारण त्यांनी स्पष्ट केलं आहे. हिरानंदानी ग्रुप्सचे साम्राज संभाळत असलेल्या निरंजन हिरानंदानी यांनी कॅप्शन मध्ये लिहिलं कि, ” मुंबईच्या ट्राफिकपासून दूर राहण्यासाठी तसेच वेळ वाचण्यासाठी त्यांनी मुंबई लोकल टेनची निवड केली.” दरम्यान त्यांनी AC कोचमधून मुंबई ते उल्हासनगरचा प्रवास मुंबईच्या लोकल ट्रेनने केला होता. हा व्हिडीओ पोस्ट करताक्षणी नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेण्यात तो यशस्वी झाला, आणि आत्तापर्यंत त्याला 22 मिलियन पेक्षाही अधिक लोकांनी पाहिलं आहे (Niranjan Hiranandani In Mumbai Local). एवढ्या अपार संपत्तीचे मालक असून देखील मुंबईच्या लोकल ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या हिरानंदानी यांचे अनेकांनी कौतुक केले. लोकं हा व्हिडियो पाहत त्यांची प्रशंसा करीत आहेत, तसेच त्यांच्या साध्या राहणीमानासाठी त्यांची वाहवा केली जातेय. कित्येक नेटकरी तर हिरानंदानी यांना आपले आदर्श देखील म्हणताना दिसतात.
निरंजन हिरानंदानी याचे नेटवर्थ किती?
रिटेल टायकून निरंजन हिरानंदानी हे हिरानंदानी कंपनीचे MD आहेत.फोर्ब्सच्या माहितीनुसार त्यांची एकूण संपत्ती 1.5 डॉलर्स म्हणजेच 12,487 कोटी रुपयांपेक्षाही अधिक असल्याचे म्हटले जाते. सुरेंद्र हिरानंदानी हे त्यांची भाऊ आहेत, आणि दोन्ही भावांनी सोबत येऊन या कंपनीचा श्रीगणेशा केला होता. एवढी संपत्ती असून देखील हरिनानंदानी यांनी दाखवलेल्या नम्रपणाची वाहवा सर्वत्र केली जात आहे. तसेच लोकं याच विनम्र स्वभावाचे कौतुक करीत आहेत.