Nirmala Sitaraman: केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमन यांनी शनिवारीला घाटकोपर रेल्वे स्थानकावरून कल्याण रेल्वे स्थानकावर लोकलगाडीतून भ्रमंती केली आणि त्यांनी लाखों मुंबईकरांच्या लोकलगाडीतून भारमंतीचा चांगलाच अनुभव घेतला. लोकलगाडीत भ्रमण करताना त्यांनी चित्रे आणि व्हिडिओज X प्लेटफॉर्मवर शेअर केले असून सर्वत्र अर्थमंत्र्यांच्या या मिळून मिसळून राहण्याचे कौतुक केले जात आहे.
अर्थमंत्र्यांनी केला लोकलचा प्रवास: (Nirmala Sitaraman)
केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण यांनी नुकताच एका अनोख्या रेल्वे प्रवासाचा अनुभव घेतला. कल्याण रेल्वे स्थानकावर पोहोचल्यावर केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पटेल यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रवासातील व्हिडिओ आणि फोटोंमध्ये सीतारमन प्रवाशांशी संवाद साधताना आणि त्यांच्याशी हसतमुखपणे बोलताना दिसत आहेत. सूत्रांनी मिलेल्या माहितीनुसार यावेळी त्यांनी प्रवाशांसोबत सेल्फीही काढले आणि त्यांच्याशी गप्पा मारल्या. या अनोख्या रेल्वे प्रवासाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे आणि लोकांनी सीतारमण यांच्या साधेपणाची आणि प्रवाशांशी सहजपणे मिसळण्याच्या क्षमतेची प्रशंसा करत आहेत.
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमन या व्हिडियोमध्ये प्रवाश्यांनी वेढलेल्या दिसत आहेत (Nirmala Sitaraman). त्या हसतमुख असून प्रवाश्यांशी संवाद साधताना दिसतात. या संवादात, सीतारमन यांनी प्रवाश्यांच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तरे दिली. तसेच यावेळी त्यांनी सरकारने उचललेल्या पावलांबद्दलही माहिती दिली. प्रवाश्यांशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देत त्यांनी प्रवाशांची मनं जिंकली, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेक लोकं सीतारमन यांचा साधेपणा आणि प्रवाश्यांशी संवाद साधण्याच्या क्षमतेचे कौतुक करत आहेत.