Nirmala Sitharaman: आत्ताच्या घडीला सर्वाधिक चर्चा केला जाणारा विषय आहे अंतरिम अर्थसंकल्प. या अर्थसंकल्पाच्या आधारे येणाऱ्या तीन महिन्यांसाठी आपला भारत कार्य करणार आहे. आकडे तपासून पहिले तर मोदी सरकारच्या अंतर्गत सादर होणार हा 10 वा अर्थसंकल्प आहे आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कारकिर्दीतील हे 6वा अर्थसंकल्प असेल. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का देशाच्या अर्थमंत्री म्हणून कामकाज सांभाळत असेल्या निर्मला सीतारामन या नक्की आहेत तरी कोण आणि त्यांची एकूण गोष्ट कशी आहे?
देशाचा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या अर्थमंत्री आहेत तरी कोण? (Nirmala Sitharaman)
आपल्या देशात 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थमंत्रालयाकडून अर्थसंकल्प सादर केला जाईल, मात्र या अर्थसंकल्पाच्या सर्वेसर्वा म्हणजेच आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन होय. अर्थमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळल्यानंतर 6 व्या वेळा अर्थसंकल्प सादर करणार आहेत, यानंतर पाच वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या आणि एक वेळा अंतरिम अर्थसंकल्प सादर करणाऱ्या मोरारजी देसाई यांच्याशी त्या बरोबरी करतील. आपल्या देशातील 5 वेळा अर्थसंकल्प सादर करणाऱ्या त्या पहिल्या महिला अर्थमंत्री आहे. मात्र याआधी त्या काय काम करत होत्या, त्यांचं एकूण शिक्षण किती आहे याबद्दल आज थोडक्यात माहिती घेऊया..
आपल्या अर्थमंत्र्यांच्या जन्म तामिळनाडू मधल्या एका भागात वर्ष 1959 रोजी झाला होता आणि मोदी सरकार स्थापनेपर्यंत त्यांचा अर्थमंत्रालयाशी कोणताही संबंध नव्हता. वडिलांची रेल्वेमध्ये फिरतीची नोकरी असल्यामुळे नेहमीच इथून तिथे फिरत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. दिल्लीमधल्या प्रसिद्ध जवाहरलाल नेहरू महाविद्यालयातून त्यांनी Economics मध्ये पदवी मिळवली आहे, तर त्यानंतर PhD साठी त्यांनी Indo-European Textile Trade हा विषय निवडला होता. पुढे लग्नानंतर त्या पतीसोबत विदेशात निघून गेल्या आणि अनेक वर्ष त्यांनी विविध कंपन्यांमध्ये नोकरी केली.
सीतारामन यांचा परिवार कसा आहे?
कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल की आज भाजप सरकारच्या अंतर्गत भारताच्या अर्थमंत्री असलेल्या निर्मला सीतारामन यांचे सासू-सासरे अस्सल काँग्रेसचे राजनैतिक होते. संपूर्ण परिवार काँग्रेसच्या पक्षात असताना सीतारामन यांनी भाजपची निवड केली. वर्ष 2008 पासून त्या भाजप सोबत कार्यरत आहेत आणि आपल्या लक्षणीय व्यक्तिमत्वामुळे त्या अनेकांच्या आदर्श आहेत. भाजप सरकार स्थापनेनंतर त्यांना सर्वात आधी राज्य मंत्री म्हणून जबाबदारी मिळाली. वर्ष 2017 मध्ये त्या देशाच्या सौरक्षण मंत्री होत्या, आणि यानंतर निवडणूका पुन्हा एकदा भाजप सरकारने जिंकल्यामुळे निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांच्यावर अर्थमंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली.