Nita Ambani : गेल्या अनेक वर्षांपासून रिलायंस कंपनीमध्ये मोलाचा वाटा असलेल्या आणि समान कष्ट घेतलेल्या नीता अंबानी यांनी ऑगस्ट महिन्यात आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. रिलायंसच्या बोर्डवर आता अंबानी यांची तिन्ही मुलं कार्यरत असून नीता अंबानी यांनी एक पाऊल मागे घेतलं आहे. पण एवढ्या वर्षात नीता अंबानी यांना किती मोबदला मिळायचा हे तुम्हाला माहित आहे का? चला तर मग याबाबत जाणून घेऊयात…..
नीता आबांनी यांचा वाटा मोलाचा : Nita Ambani
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखाली रिलायंस कंपनीने अनेक उच्च शिखरे गाठली आहेत. मात्र इथे त्यांना कायम मोलाची साथ मिळाली ती नीता अंबानी यांच्याकडून. नीता अंबानी यांना हल्लीच त्यांच्या सामाजिक कार्यासाठी मुंबईत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं होतं. पण आता मुलांच्या हाती कंपनीची जबाबदारी देऊन त्यांनी एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. अनेक वर्षे रिलायन्स संचालक मंडळाचे सदस्य राहिल्यानंतर नीता अंबानी यांनी ऑगस्ट 2023 मध्ये आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा RIL च्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (AGM)केली होती. नीता अंबानी यांनी राजीनामा दिल्यानंतर आता अंबानी यांची तिन्ही मुलं कामाची धुरा सांभाळणार आहेत.
नीता अंबानी यांना पगार नव्हता:
गेल्या अनेक वर्षांपासून रिलायंस कंपनीच्या सदस्या म्हणून काम करत असलेल्या नीता अंबानी (Nita Ambani) यांना मासिक वेतन मिळायचे नाही. त्यांना RILच्या बोर्ड कडून बैठकींसाठी फक्त फी दिली जायची पण पगार कधीही मिळाला नव्हता. RIL च्या वार्षिक अहवाल सांगतो कि नीता अंबानी यांना बोर्डाच्या बैठकीत उपस्थित राहण्यासाठी सुमारे 6 लाख रुपये फी दिली गेली आहे आणि यंदाच्या आर्थिक वर्षासाठी त्यांना 2 कोटी रुपयांचे कमिशन देण्यात आले आहे. आता मात्र पदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांना RIL कडून कोणतेही स्टॉक ऑप्शन्स, बोनस किंवा कमिशन दिले जाणार नाही. रिलायन्सच्या संचालक मंडळाचा राजीनामा दिल्याबरोबरच नीता अंबानी यांनी धीरूभाई अंबानी इन्स्टिट्यूटमधील पदावरून काढता पाय घेतला आहे आणि आता त्यांचे हे पद मुलगी ईशा अंबानीकडे सोपवण्यात येईल.