Nita Ambani यांना मिळाला Citizen Of Mumbai पुरस्कार

बिझनेसनामा ऑनलाईन । रिलायन्स कंपनीचे नाव ऐकलं नाही असं क्वचितच कुणीतरी असेल. रिलायन्स कंपनीसाठी आज एक आनंदाची बातमी समोर आली आहे. रिलायन्स फौंडेशनच्या संस्थापक आणि अध्यक्षा नीता अंबानी (Nita Ambani) यांना रोटरी क्लब ऑफ बॉम्बेने (Rotary Club Of Bombay)ने सिटीझन ऑफ मुंबई (Citizen Of Mumbai) हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन सन्मानित केलं आहे.

नीता अंबानी यांना सिटीझन ऑफ मुंबई पुरस्कार का मिळाला?

सिटीझन ऑफ मुंबई हा एक प्रतिष्ठित सन्मान असून, रोटरी क्लबतर्फे समाजातील विविध क्षेत्रांमध्ये लक्षणीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना तो दिला जातो. हा पुरस्कार देऊन एकार्थाने त्यांच्या कामाची दाखल घेतली जाते, व इतरांना प्रेरणा मिळावी म्हणून अशी सामाजिक कामं सर्वांच्या नजरेत आणून दिली जातात. परिवर्तन संस्थांच्या माध्यमातून क्रीडा, आरोग्य, कला आणि संस्कृती या विविध क्षेत्रांमध्ये दिलेल्या योगदानामुळे नीता अंबानी (Nita Ambani) यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. सदर माहिती अंबानी यांनी रिलायन्स फौंडेशनच्या अधिकृत सोशल मिडियावरून सर्वांसोबत शेअर केली.

नीता अंबानी : एक यशस्वी महिला– (Nita Ambani)

नीता अंबानी या इंडिअन प्रीमियर लीग (Indian Premier League)च्या सर्वात यशस्वी संघ म्हणजेच मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) च्या मालकीण आहेत. तसेच फुटबॉलमधील स्पोर्ट्स डेव्ह्लोप्मेंट लिमिटेडच्या संस्थापक अध्यक्षा आहेत. या कंपनीकडून इंडिअन सुपर लीग (Indian Super League)ची सुरुवात केली होती. नीता अंबानी या आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीच्या तसेच मेट्रोपोलीटन म्युइज़ियम ऑफ आर्टच्या पहिल्या भारतीय महिला सदस्या आहेत. मुंबईमध्ये मुकेश अंबानी यांनी कल्चरल सेंटरची सुरुवात केली, त्यामागे नीता अंबानी यांचाच विचार होता व यातर्फे भारतीय कला व संस्कृती जगासमोर आणणे हेच त्यांचे ध्येय होते. त्यांची हि कामगिरी पाहता त्यांना मिळालेला सन्मान योग्य वाटतो.