Nithin Kamath: देशातील सर्वात मोठ्या स्टॉक ब्रोकिंग प्लॅटफॉर्म झिरोधा संबंधित एक मोठी बातमी अलीकडच्या दिवसांत समोर आली आहे. वास्तवात, कंपनीचे संस्थापक 44 वर्षीय नितीन कामथ यांनी स्ट्रोकच्या आघात सहन केला, नंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता देखील तयार झाली होती. अब्जाधीश उद्योजक नितीन कामथ हे स्वतः फिटनेसचे चाहते आहेत आणि सोशल मीडियावरून नेहमीच इतरांना प्रोत्साहन देत असतात. या कठीण काळात देखील त्यांनी X प्लॅटफॉर्मवर पोस्ट करून सांगितले की 6 आठवड्यांपूर्वी त्यांना स्ट्रोक आला होता.
कामथ यांना स्ट्रोकने ग्रासलं: (Nithin Kamath)
झेरोधाचे संस्थापक नितीन कामथ हे आपल्या फिटनेसबद्दल खूप जागरूक आहेत, आणि या स्ट्रोकमुळे त्यांना स्वतःलाच जबरदस्त धक्का बसलाय. त्यांनी म्हटले आहे की, “पूर्णपणे तंदुरुस्त असलेली आणि स्वतःची काळजी घेणारी व्यक्ती याचा सामना कशी करू शकते? याचेच मला मला आश्चर्य वाटते.” मात्र, त्यांनी या स्ट्रोकचे प्रमुख कारण सांगितले नाही. सोशल मीडियावर ही माहिती शेअर करताना त्यांनी सांगितलं की, या घटनेनंतर त्यांचा चेहरा थोडा झुकला आहे. या स्ट्रोकनंतर ते वाचू किंवा लिहू शकत नाही. या शरीरदोषातून पूर्णपणे बरे होण्यासाठी त्यांना निदान 3 ते 6 महिने लागतील.
याच पोस्टमध्ये त्यांनी वडिलांच्या निधनाबद्दल देखील थोडक्यात माहिती दिली. ते म्हणतात की त्यांच्या वडिलांच्या मृत्यूमागे झोपेची कमतरता, थकवा, Dehydration आणि अतिशय काम करणे हे घटक कारणीभूत होते आणि आता यापैकी कोणतेही कारण आता त्याच्याही बाबतीतही घडू शकते अशी शंका त्यांना येत आहे. निखिल कामथ (Nithin Kamath) हे सोशल मीडियावर स्वतःची फिटनेस जपण्यावर भर देणारे एक तरुण अब्जाधीश असून, अशी पोस्ट टाकल्यानंतर लोकांना आश्चर्य वाटले आणि ते लवकर बरे होण्यासाठी लोकं प्रार्थना करत आहेत.