Nitin Gadkari News : जगप्रसिद्ध कंपनी टेस्लाचे मालक एलोन मस्क यांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी खुल्या शब्दात थेट इशारा दिला आहे. भारत सरकार टेस्ला सारख्या उच्च श्रेणीतील, तांत्रिकदृष्ट्या प्रगत वाहन उत्पादकांना उद्देशून धोरणात्मक चौकटीचा विचार करत आहे. परंतु इलॉन मस्कच्या नेतृत्वाखालील टेस्ला चीनमध्ये उत्पादन करून भारतात विक्री करू इच्छित असल्यास, सवलत दिली जाणार नाही.” असा स्पष्ट संदेश गडकरी यांनी दिला आहे. गडकरी यांच्या वक्तव्याची चर्चा आता संपूर्ण देशभरात केली जात आहे.
गडकरी नेमकं काय म्हणाले? Nitin Gadkari News
भारताच्या बाजारपेठेत टेस्लाचे स्वागत करण्यासाठी भारत सरकार नक्कीच उत्सुक आहे, आपल्या देशातील बाजारपेठ मोठी आहे आणि तिला अश्या बहुराष्ट्रीय कंपन्यांची गरज नक्कीच आहे, भारतीय बाजारात दररोज हजारो विक्रेते व्यापार करीत असतात. टेस्ला कंपनीला भारतात उत्पादन करण्यासाठी हर प्रकारची मोकळीक आणि मदत दिली जाईल मात्र चीन या शेजारी देशात उत्पादन करून जर का कंपनी भारतीय बाजारपेठेत त्याची विक्री करायचा विचार करत असेल तर ते मात्र मान्य केले जाणार नाही असं नितीन गडकरी (Nitin Gadkari News) यांनी म्हंटल आहे.
मोदी सरकारकडून टेस्ला कंपनीला प्रोत्साहन:
मोदी सरकार देशात इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देऊ पाहत आहेत, देशात टेक्नॉलॉजीची वाढ व्हावी म्हणून सरकारकडून टेस्लासारख्या उच्य श्रेणीतील कंपन्यांसाठी एक योजना बनवली जात आहे. स्थानिक सोर्सिंगसह देशांत चालणाऱ्या उत्पादनाला प्रोत्साहन देण्यासाठी ही प्रणाली तयार करण्यात आली आहे आणि इथे इलेक्ट्रिक वाहनांवर लागणाऱ्या आयात शुल्कात मोठ्या प्रमाणात कपात करण्यात येणार आहे.
या संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेस्लाचे सर्वेसर्वा एलोन मास्क यांची अमेरिकेत भेट घेतली होती . 500,000 युनिट्सचे वार्षिक उत्पादन करू शकणारा कारखाना भारतात उभारण्याचा टेस्ला कंपनीचा विचार आहे, जो देशातून निर्यातीचे काम करेल. यात मॉडल रेंजमध्ये 20 लाखांपेक्षा कमी किमतींच्या गाड्यांचा समावेश असेल