No Cost-EMI : अनेकदा वस्तूंची खरेदी करताना मोठमोठाल्या दुकानांमध्ये किंवा मॉलमध्ये तुम्ही No Cost-EMI बद्दल नक्कीच ऐकलं असेल. आजच्या काळात आपण अनेक वेळा ऑनलाईन खरेदी करत असतो आणि यामध्ये सुद्धा No Cost-EMI चे विविध फायदे समजून सांगितले जातात. मात्र No Cost-EMI म्हणजे नेमकं आहे तरी काय ? याची अनेकांना माहिती नसते. नो कॉस्ट या शब्दाचा आपण शब्दशः अर्थ घेतो आणि एखाद्या वस्तूच्या विक्रीवर विनामूल्य सेवा मिळवता येईल असा त्याचा अर्थ घेऊन व्यवहार सुरु करतो मात्र No Cost-EMI म्हणजे नेमकं काय हे आज जाणून घेऊया.
नो कॉस्ट ईएमआय(No Cost-EMI) म्हणजे काय?
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे No Cost-EMI याचा कोणीही शब्दशः अर्थ घेऊ नये, कारण लक्ष्यात घ्या की आत्ताच्या घडीला कोणीही कुठलीही गोष्ट किंवा सेवा मोफत प्रदान करत नाहीत याचा अर्थ असा की No Cost-EMI ही मोफत सेवा नाही, यासाठी आपल्याला काहीशी रक्कम नक्क्कीच मोजावी लागते. खास करून सणासुदीच्या काळात तुम्ही अनेक कंपन्यांना No Cost-EMI ची जाहिरात करताना पाहिलं असेल. गृहपयोगी वस्तू किंवा वाहनं आणि गॅजेट्स यांसारख्या वस्तूंच्या विक्रीवर No Cost-EMIची खास सवलत दिली जाते.
No Cost-EMI मध्ये ग्राहकांना अतिरिक्त व्याज किंवा फी भरावी लागत नाही. या सेवेचा लाभ घेऊन तुम्ही अतिरिक्त व्याज न भरता हप्त्यांमध्ये उत्पादनाची खरेदी करू शकता. मात्र अनेक वेळा ही खरेदी नुकसानकारक ठरू शकते त्यामुळे अशा प्रकारची खरेदी करत असताना नेहमीच विचारपूर्वक निर्णय घ्यावा व कंपनीने दिलेल्या सर्व बाबींची माहिती तपासून घ्यावी. No Cost-EMI मध्ये देखील तुम्हाला खरेदी केलेल्या वस्तूवर आकारले जाणारी रक्कम भरावीच लागते मात्र यामध्ये केवळ व्याज किंवा इतर शुल्क आकारलं जात नाही.
No Cost-EMI घेण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा:
No Cost-EMI ची सेवा मिळवण्यापूर्वी तुमच्या सोयीनुसार परतफेडीचा कालावधी निवडता येतो आणि हा कालावधी 3 ते 24 महिन्यांपर्यंत वैध असतो. No Cost-EMI सेवेमध्ये कोणीही तुमच्याकडून व्याज आकारू शकत नाही याचाच अर्थ असा की तुम्हाला केवळ खरेदी केलेल्या वस्तूची किंमत परत करावी लागते मात्र इथे अनेक वेळा बँका No Cost-EMI साठी प्रक्रिया शुल्क आकारात असतात. ही सेवा निवडणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला उत्पादनावर मिळणारी सवलत दिली जात नाही त्यामुळेच कोणत्याही प्रकारच्या No Cost-EMI सेवेची निवड करण्यापूर्वी सर्व अटी आणि नियम तपासून घ्या.