Nobel Prize 2023 : अर्थशास्त्रात क्लॉडीया गोल्डीन यांना पुरस्कार जाहीर; जाणून घ्या सारी कामगिरी…

Nobel Prize 2023: नोबल पुरस्कार हा जगातील सर्वात प्रतिष्ठीत पुरस्कार मानला जातो. रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, जीवनशास्त्र, जागतिक शांतता, अर्थशास्त्र अश्या पाच क्षेत्रांमध्ये प्रशंसनीय कामगिरी केल्याबद्दल किंवा संशोधन केल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. वर्ष 2023 साठी अर्थशास्त्रातील नोबल पुरस्कार क्लॉडीया गोल्डीन (Claudia Goldin) यांना जाहीर झाला आहे. रॉयल स्वीडिश अकादमीने या पुरस्कारासाठी त्यांची निवड केली आहे. तर कोण आहेत या क्लॉडीया गोल्डीन आणि कोणत्या विशेष कामगिरीबद्दल त्यांना हा सन्मान दिला जातोय हे हि जाणून घेऊया…

क्लॉडीया गोल्डीन कोण आहेत (Nobel Prize 2023)

क्लॉडीया गोल्डीन यांनी महिला श्रमिक बाजारात उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे.त्या हावर्ड महाविद्यालयात अर्थशास्त्राच्या (Economics) प्रोफेसर आहेत. याआधी वर्ष 1989 ते 2017 पर्यंत त्या नेशनल ब्युरो ऑफ एकोनोमिक रिसर्च (National Bureau Of Economic Research) च्या एका प्रोग्रामच्या संचालिका म्हणून कार्यरत होत्या.

क्लॉडीया गोल्डीन या एक आर्थिक इतिहासकार व कामगार अर्थशास्त्रज्ञ आहेत, त्याच्या संशोधनाचा प्रमुख उद्देश हा महिला कामगार, उतपन्नातील लिंग अंतर, असमानता, तांत्रिक बदल , शिक्षण आणि स्थलांतर असे आहेत. आपल्या संशोधनातून अनेकवेळा त्यांनी भूतकाळाचा आधार घेत वर्तमानाचा अंदाज लावण्याचा प्रयत्न केल आहे.

क्लॉडीया गोल्डीन यांना नोबल पुरस्कार का?

नोबल पुरस्कार समितीच्या म्हणण्यानुसार क्लॉडीया गोल्डीनयांच्या संशोधनातून लैगिक अंतराबाबत ( Gender Inequality) बद्दल माहिती मिळते. त्यांच्या संशोधनामुळे महिलांचे उत्पन्न आणि श्रमिक बाजारातील परिणाम यांवर एक ठोस दास्तेवज जाहीर केला आहे. अर्थशास्त्रातील मिळणारा हा पुरस्कार (Nobel Prize 2023) 10 दशलक्ष स्वीडिश क्रोना म्हणजे सुमारे 9 लाख 7 हजार डॉलरच्या आसपास आहे. आल्फ्रेड नोबल यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिला जाणारा हा पुरस्कार आहे. गेल्या वर्षी अर्थशास्त्रामध्ये कामगिरी बजावणाऱ्या बेन बनर्के, डगल्स डायमंड आणि फिलीप डीबिगोना यांना देण्यात आला होता.