Nokia Layoffs : मागच्या काही दिवसांपासून अनेक टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. गुगल, LinkedIn नंतर आता अजून एका मोठ्या कंपनीने कर्मचाऱ्यांच्या आकड्यात कपात केली आहे. गेल्या काही महिन्यांत मायक्रोसॉफ्ट, मेटा आणि ट्विटर सारख्या कंपन्यांनी अनेक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. अमेरीकेत सुरु असलेल्या मंदीचा परिणाम आता महागाईवर होणार आहे. वाढती महागाई सर्वांसाठीच जोखीम ठरली असून कंपन्यांकडून आपल्या कर्मचारी वर्गाला दाखवला जाणारा बाहेरचा रस्ता त्यांच्यासाठी डोकेदुखी बनली आहे. तिसऱ्या तिमाहीच्या कमाईत घसरण झाल्यामुळे Nokia कंपनीने कर्मचाऱ्यांना नारळ देण्याचा निर्णय घेतला आहे.
14,000 कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता: Nokia Layoffs
नोकिया कंपनीच्या तिसऱ्या तिमाहीतील कमाईत घसरण झाली आहे. हि घसरण डोकेदुखी झाल्यामुळे आपल्या कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी Nokia 14,000 कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. उत्तर अमेरिकेसारख्या मोठ्या बाजारपेठेत 5G उपकरणांची मागणी कमी झाल्यामुळे कंपनीच्या महसुलात घसरण झाली. सुमारे 20 टक्क्यांची घसरण झाल्यामुळे आता बचत करण्यासाठी कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता (Nokia Layoffs) दाखवणार आहे. सध्या कंपनीकडे एकूण 86,000 कर्मचारी आहेत, ज्यातील काही जणांना कामावरून काढून टाकल्यानंतर हा आकडा 72,000 पर्यंत येण्याची शक्यता आहे.
कर्मचाऱ्यांना मिळणार मदत:
कंपनी जरी आपला कर्मचारी वर्ग कमी करणार असली तरी ते आपल्या कर्मचाऱ्यांचे कौशल्य जाणून आहेत आणि केवळ काळाची गरज म्हणून त्यांना हा मोठा निर्णय घ्यावा लागत असला तरीही यानंतर ते कर्मचाऱ्यांना जमेल तेवढं सहकार्य करतील. सध्या बाजारात कशी रिकव्हरी करावी याबद्दल सध्यातरी अधिकारी काही बोलत नाही आहेत, पण त्यांचे धोरणात्मक काम सुरु आहे.