Nova Agri Tech IPO : धमाका! नोवा अग्री टेकच्या 143 कोटींच्या आयपीओची 23 तारखेपासून धडक!

Nova Agri Tech IPO : तुम्हाला जर का आयपीओ(IPO) मध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असेल तर 23 जानेवारी म्हणजेच मंगळवारी एग्रीकल्चर(Agriculture) क्षेत्रामधून एक प्रसिद्ध कंपनी तिचा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी जाहीर करणार आहे. नोवा ॲग्री टेक लिमिटेड (Nova Agri Tech ltd) ही कंपनी मंगळवारी ग्राहकांसाठी IPOची घोषणा करणार असल्याची माहिती माध्यमांना मिळाली आहे. कंपनीला जवळपास 143.81 कोटी रुपयांचा फंड जमा करायचा असल्याने कंपनीने IPO च्या दिशेने पाऊल उचललेली आहेत.

काय असेल नोवा अग्रिकल्चरचा आयपीओ? (Nova Agri Tech IPO)

नोवा अग्री टेक या कंपनीने 39 ते 41 रुपये प्रति शेअर अशी IPO ची किंमत ठरवली आहे, तसेच या शेअर्सची फेस व्हॅल्यू (Face Value) 2 रुपये प्रति शेअर अशी असेल. कंपनीच्या या आयपीओ(IPO) मध्ये गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेले गुंतवणूकदार 365 शेअर्सवर बोली लावू शकतात, तसेच जर का तुम्हाला अधिकाधिक शेअर्सवर बोली लावायची असेल तर 13 शेअर्स‌ची लॉट साईझ म्हणजेच 4,745 शेअर्सवर बोली लावली जाऊ शकते. मंगळवारी आयपीओ(IPO) जाहीर करून कंपनीला 35,075,693 इक्विटी शेअर्सची (Equity Shares) विक्री करायची आहे. यांपैकी 112 कोटी रुपये फ्रेश इशू (Fresh Issue) असतील तर 31.81 कोटी रुपयांचे शेअर्स ऑफरवर विकले जाणार आहेत. किरकोळ गुंतवणूकदार IPO मध्ये किमान 14,965 आणि कमाल 1,94,545 रुपयांची बोली लावू शकतात.

मंगळवारी म्हणजेच 23 जानेवारी 2024 रोजी कंपनी आयपीओ(IPO)ची विक्री सुरू करेल आणि इच्छुक गुंतवणूकदार 25 जानेवारीपर्यंत या आयपीओ(IPO)वर बोली लावू शकतील. खरेदी-विक्री पूर्ण झाल्यानंतर 29 जानेवारी 2024 रोजी या शेअर्सची अलॉटमेंट(Allotment) केली जाईल, दरम्यान ज्या गुंतवणूकदारांना शेअर्सची अलॉटमेंट मिळालेली नाही त्यांना 30 जानेवारीपर्यंत रिफंड दिला जाईल. IPO मध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी 35 टक्के हिस्सा राखीव ठेवण्यात आला आहे तसेच 15 टक्के हिस्सा हाई नेट इंडिविजुअल्स(High Net Individuals) आणि 15 टक्के हिस्सा क्वालिफाइड इंस्टीट्यूशनल बायर्ससाठी(Qualified Institutional Buyers)राखीव ठेवण्यात आला आहे.