NTPC Shares: पंतप्रधानाच्या घोषणेने केलं NTPC ला मालामाल; शेअर्सचे आकडे वाढले

NTPC Shares: आपल्या देशातील एका सरकारी कंपनीच्या शेअर्सनी आज मोठी झेप घेतली. ही कोणतीही सामान्य कंपनी नसून ती म्हणजे आपल्या सर्वांना परिचित असलेली NTPC कंपनी आहे. कंपनीचे शेअर्स सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास 4 टक्क्यांनी वाढून 355 रुपयांच्या दराने विक्री होत होते. मागील सहा महिन्यांत NTPC च्या गुंतवणूकदारांना 50 टक्क्यांहून अधिकचा परतावा मिळाला आहे.

NTPC च्या शेअर्सनी केली कमाल: (NTPC Shares)

गेल्या वर्षात NTPC च्या शेअर्समध्ये तब्बत 100 टक्क्यांची वाढ झाली आहे. शनिवारी शेअर बाजार बंद झाल्यावर NTPC चा शेअर 0.47 टक्क्यांनी घसरून 341.85 रुपयांवर बंद झाला. गेल्या महिन्यातही NTPCच्या शेअर्समध्ये 6 टक्क्यांची वाढ झाली. एवढेच नाही तर NTPC चे मार्केट कॅप देखील 3.31 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे.

देशाच्या विकासाला मोठी चालना देणारी घडामोड:

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज 30,000 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या NTPC च्या विद्युत प्रकल्पांना राष्ट्राला समर्पित केलं आणि पायाभरणी करून दिली(NTPC Shares). या महत्वाकांक्षी प्रकल्पांमुळे भारताची ऊर्जाभूक भागणारच नाही तर देशात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होऊन, स्थानिक समाजाचा विकास आणि पर्यावरणाचंही रक्षण होणार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पेड्डापल्ली जिल्ह्यातील NTPC च्या तेलंगणा Super Thermal Power Project च्या दुसऱ्या युनिटचे (800MG) लोकार्पण केले. हे युनिट तेलंगणा राज्याला 85 टक्के वीज पुरवठा करेल. या प्रकल्पाची पहिली युनिट गेल्या ऑक्टोबर 2023 मध्ये कार्यान्वित झाली असून, आता दुसऱ्या युनिटच्या लोकार्पणामुळे राज्यातील वीज पुरवठा आणखी मजबूत होणार आहे.