Nvidia Share Price: अदानी-अंबानींची संपत्ती ठरली कवडीमोल; अमेरिकी कंपनीने एका दिवसांत मारली बाजी

Nvidia Share Price: अमेरिकन AI चिप्स बनवणारी कंपनी Nvidia ने गुरुवारी एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम केला. चौथ्या तिमाहीतील उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर कंपनीचा शेअर 16.4 टक्क्यांनी वाढून बंद झाला. यासोबतच कंपनीचे मार्केट कॅप 277 अब्ज डॉलरने वाढले, जे आतापर्यंत कोणत्याही कंपनीच्या मूल्यांकनात एका दिवसात आलेली सर्वात मोठी वाढ आहे.

अदानी -अंबानींना देखील मागे टाकलं: (Nvidia Share Price)

कंपनीची आकडेवारी भारतातील दोन सर्वात श्रीमंत व्यक्ती, मुकेश अंबानी आणि गौतम अदानी यांच्या एकूण संपत्तीपेक्षा जास्त आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर इंडेक्सनुसार, अंबानी यांच्या एकूण संपत्ती 112 अब्ज डॉलर तर अदानींची एकूण संपत्ती 102 अब्ज डॉलर आहे. दोघांची संपत्ती जर का आपण मिळवली तर ती 214 अब्ज डॉलरचा आकडा सहज गाठेल, मात्र Nvidiaच्या उत्कृष्ट तिमाही निकालांमुळे त्यांचे मार्केट कॅप एका दिवसात 200 अब्ज डॉलरने वाढून 1.96 ट्रिलियन डॉलरपर्यंत पोहोचले आहे. ही वाढ जगातील कोणत्याही कंपनीसाठी एका दिवसातली सर्वाधिक वाढ म्हणावी लागेल. आता जगातील फक्त तीन कंपन्यांचे मार्केट कॅप Nvidia पेक्षा जास्त आहे.

Nvidia च्या अगोदर अशी बाजी मारणारी कंपनी कोणती?

Nvidia ने एका दिवसात सर्वाधिक कमाईचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी हा विक्रम मार्क झुकरबर्गच्या मेटा प्लॅटफॉर्मच्या (Meta Platform) नावावर होता. 2 फेब्रुवारी रोजी मेटा प्लॅटफॉर्मची बाजारपेठेतील किंमत 196 अब्ज डॉलर वाढली होती. मात्र, 20 दिवसांतच Nvidia ने हा विक्रम मोडीत काढला(nVINDIA share price). Nvidia चे शेअर्स गुरुवारी 14 टक्क्यांनी वाढले, ज्यामुळे कंपनीची बाजारपेठेतील किंमत 760 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचली. या वाढीमुळे Nvidia जगातील सर्वात मोठ्या software कंपन्यांपैकी एक बनली आहे.