हिंडेनबर्गनंतर आणखी एक संस्था धक्कादायक अहवाल प्रदर्शित करणार; निशाण्यावर कोण?

बिझनेसनामा ऑनलाईन । अमेरिकन रिसर्च फर्म, हीडनबर्गच्या अहवालाकडून अदानी समूहावर मोठ्या प्रमाणात आरोप करण्यात आले होते. या नंतर आता The Organized Crime and Corruption Reporting Project (OCCRP) ही संस्था भारताच्या अजून एका औद्योगिक समूहावर गंभीर आरोप करण्याच्या तयारीत आहे. या संस्थेचं काम औद्योगिक कंपन्यांबद्दल माहिती देणं असं आहे. या संस्थेला Gorge Souras आणि Rockfailar Brothers Fund चा पाठींबा आहे.

OCCRP तयार करणार अहवांलाची मालिका

OCCRP या संस्थेची स्थापना युरोप ,आफ्रिका,आशिया आणि लेटीन अमेरिकेत पसरलेल्या चौवीस Non-Profit Investigative Center द्वारे केली जाते. मिळालेल्या माहितीनुसार OCCRP येणाऱ्या काही दिवसांत त्या एका औद्योगीक कंपनी बद्दल एक आहावालंची मालिका प्रकाशित करणार आहे.ते कोणत्या औद्योगिक कंपनी बद्दल रिपोर्ट प्रदर्शित करणार आहेत ह्याचा खुलासा अजून झालेला नाही. तरीही सदर कंपनीसोबत अनेक परदेशी funds ची गुंतवणूक असल्याची माहिती समोर आली आहे.

काय आहे OCCRP?

The Organized Crime and Corruption Reporting Project एक जागतिक स्तरावरील Investigative Journalism चा समूह आहे. हा समूह सहा खंडांवर चालणाऱ्या घडामोडींवर लक्ष ठेऊन असतो. या समूहाची सुरुवात वर्ष 2006 मध्ये झाली होती, आणि ते विशेषतः भ्रष्टाचार आणि इतर गुन्ह्यांवर बातमी तयार करायचे. इंग्रजी आणि रशिअन भाषांमध्ये या बातम्यांचं संपादन केल जायचं.

हिंडनबर्गने केले होते अदानी समूहाविरुद्ध गंभीर आरोप –

ह्याच वर्षी 24 जानेवारीला हिंडनबर्गच्या रिसर्च अहवालात अदानी समूहाविरुद्ध Audit मध्ये फसवणूक, शेअर्सच्या किमतीत बदल आणि tax waves चा अयोग्य वापर केल्याचा आरोप करण्यात आला होता. ह्यामुळे अदानी समूहाला मोठे नुकसान झाले होते, मात्र अदानीसमूहाने हे सर्व आरोप खोटे असल्याचा दावा केल होता. अदानी नंतर आत्ता या नवीन औद्योगिक कंपनीबद्दल काय बातमी समोर येते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. ह्यावेळी ही कंपनी नेमकी कोणती आहे व त्यांच्या विरुद्ध कोणते आरोप आहेत यांचाही खुलासा होईल.