बिझनेसनामा ऑनलाईन । अदानी समूह हा भारतातील सर्वात मोठ्या समूहापैकी एक मानला जातो. त्यामुळे मार्केटमधील त्यांची ओळख ही गगनाला भिडलेली आहे. मात्र काही दिवसांपूर्वी हिंडेनबर्गने केलेल्या आरोपांमुळे अदानी समूहाची मोठी बदनामी झाली आणि अदानींना मोठा आर्थिक फटका बसला होता. आता कुठे अदानी समूह या प्रकरणातून बाहेर पडत असतानाच आता ऑर्गनाइज्ड क्राईम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्टने (OCCRP Report On Adani) अदानी समूहावर गंभीर आरोप केले आहेत. अदानी समूहाने गुपचूप स्वत:चे शेअर्स खरेदी करून स्टॉक एक्स्चेंजमध्ये लाखो डॉलर्स गुंतवल्याचा दावा OCCRP ने केला आहे.
काय आहे नेमक प्रकरण? OCCRP Report On Adani
ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) ने एक अहवाल प्रकाशित केला ज्यामध्ये अदानी ग्रुपने “अपारदर्शक” मॉरिशस फंडांद्वारे सार्वजनिकपणे व्यापार केलेल्या स्टॉकमधील गुंतवणूक राउटिंग केल्याचा आरोप केला. त्यानुसार, 2013 ते 2018 या काळात अदानी समुहाच्याच कंपन्यांनी त्यांचे शेअर्स गुपचूप खरेदी केले असल्याचं समोर आलं आहे. OCCRP ने दावा केला आहे की यामुळे कथित अदानी कुटुंबातील व्यावसायिक भागीदारांचा सहभाग अस्पष्ट आहे. OCCRP चा अहवाल यूएस- आधारित (OCCRP Report On Adani) शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर कर आश्रयस्थानातील ऑफशोअर संस्थांचा हवाला देऊन अयोग्य व्यावसायिक व्यवहार केल्याचा आरोप केल्यानंतर आठ महिन्यांनी आला आहे. अदानी समूहाने यापूर्वी हे दावे फेटाळून लावले होते.
प्रतिमा मलीन करण्याचे काम सुरु आहे – अदानी
OCCRP च्या या आरोपांवर (OCCRP Report On Adani) पलटवार करताना गौतम अदानी यांनी म्हंटल कि, “माझी प्रतिमा मलीन करून माझे वाढलेले शेअर्स खाली आणण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. आमच्या स्टॉकच्या किमती खाली आणून नफा मिळवणे हा या प्रयत्नांचा उद्देश आहे आणि या लहान विक्रेत्यांवर विविध प्राधिकरणांकडून चौकशी सुरू आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय आणि सेबी या गोष्टींवर देखरेख करत असल्याने, सध्या सुरू असलेल्या नियामक प्रक्रियेचा आदर करणे अत्यावश्यक आहे.”
अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 3 टक्क्यांनी घसरले
OCCRP चा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, अदानी एंटरप्रायझेस या प्रमुख कंपनीचे शेअर्स 3 टक्क्यांनी घसरले आहेत. या आरोपानंतर अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर, अदानी ग्रीन, अदानी टोटल गॅस आणि अदानी विल्मार या समुहातील इतर कंपन्यांचे शेअर्स मध्ये 1% ते 5% च्या दरम्यान घसरण पाहायला मिळाली आहे. यामुळे अदानीची चिंता चांगलीच वाढलीये. अदानी यांच्यावरती चालू असलेल्या आरोप प्रत्त्यारोपामुळे त्यांचे मार्केट डाउन झाले आहे.