OCCRP Report On Vedanta : अदानीनंतर OCCRP च्या निशाण्यावर Vedanta!! पहा काय केले आरोप?

बिझनेसनामा ऑनलाईन । प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी यांच्यानंतर आता OCCRP ने अनिल अग्रवाल यांच्या नेतृत्वाखालील वेदांता ग्रुपवर निशाणा (OCCRP Report On Vedanta) साधला आहे. जॉर्ज सोरोस-समर्थित वृत्तसंस्थेने दावा केला आहे की वेदांतने कोरोनाच्या काळात पर्यावरणीय कायदे कमकुवत करण्यासाठी गुप्तपणे लॉबिंग केले होते. त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. OCCRP यापूर्वी अदानी समूहावर स्वतःचेच शेअर विकत घेतल्याचा आरोप केला होता.

कोविड -19 दरम्यान वेदांताने केली गुप्त लॉबिंग

ऑर्गनाइज्ड क्राइम अँड करप्शन रिपोर्टिंग प्रोजेक्ट (OCCRP) ने म्हटले आहे की कोविड-19 साथीचा रोग भारतभर पसरत असताना, प्रमुख खाण आणि तेल कंपनी वेदांतने तेल आणि खाण उद्योगांचे नियमन करणार्‍या पर्यावरणीय सुरक्षा उपायांना सौम्य करण्यासाठी गुप्त लॉबिंग केले. गुरुवारी प्रकाशित झालेल्या अहवालात म्हंटल (OCCRP Report On Vedanta) आहे कि, भारत सरकारने सार्वजनिक सल्लामसलत न करता बदल मंजूर केले आणि तज्ञांच्या मते बेकायदेशीर पद्धती वापरून त्यांची अंमलबजावणी केली.

काय लिहिले आहे अहवालात? (OCCRP Report On Vedanta)

OCCRP च्या अहवालानुसार, जानेवारी 2021 मध्ये वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी माजी पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांना कळवले की खाण कंपन्या नवीन पर्यावरणीय परवानग्या न घेता उत्पादन 50 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतात. ज्यामुळे भारताच्या आर्थिक सुधारणाला चालना मिळू शकते. वेदांताची तेल शाखा, केयर्न इंडियाने सरकारी-लिलाव केलेल्या तेल ब्लॉक्समधील अन्वेषण ड्रिलिंगसाठी सार्वजनिक सुनावणी काढून टाकण्यात यशस्वीरित्या प्रभाव पाडला. तेव्हापासून, केयर्नच्या राजस्थानमधील वादग्रस्त तेल प्रकल्पांपैकी सहा प्रकल्पांना स्थानिक विरोधाला न जुमानता मान्यता देण्यात आली आहे. असे या अहवालात म्हटले आहे.

आरोप असूनही वाढले वेदांता उपकंपण्यांचे शेअर्स

OCCRP ने केलेल्या या आरोपानंतरही (OCCRP Report On Vedanta) वेदांता उपकंपण्यांचे शेअर्स तेजीत पाहायला मिळत आहेत. वेदांता समूहाची भारतीय उपकंपनी वेदांत लिमिटेडचे ​​शेअर्स सकाळी 10 वाजता 1.42 टक्क्यांनी वाढून 235.60 रुपयांवर पोहोचले

दरम्यान, वेदांतापूर्वी OCCRP ने गौतम अदानी यांच्यवरही निशाणा साधला होता. अदानी समूहाने स्वतःचे शेअर्स गुपचूप खरेदी करून कौटुंबिक व्यवसाय भागीदाराद्वारे स्टॉक एक्स्चेंजमध्ये लाखो डॉलर्सची गुंतवणूक केल्याचा गंभीर आरोप OCCRP ने केला. यानंतर अदानी समूहाने ओसीसीआरपीचे सर्व दावे फेटाळले असले तरी. मात्र, OCCRP च्या अहवालानंतर अदानीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. आली. OCCRP च्या रिपोर्ट नंतर अदानीच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे 40 हजार कोटी रुपयांची घट झाली आहे.