Odisha Raid : नोटांचे ढिगारे पाहून मशीन दमल्या; तरीही मोजणी थांबत नाही, काय आहे प्रकरण?

Odisha Raid : आपल्या देशात गेल्या कित्येक दिवसांपासून भ्रष्टाचार काळे ढग वावरत आहेत. मोठमोठी लोकं त्यांच्याजवळ असलेल्या अधिकारांचा वापर करून देशातील पैसे लुटतात. कित्येकवेळा असे गुन्हे समोर आले आहेत, आणि वेळोवेळी सरकारकडून वाढणाऱ्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी विविध बाजूंनी प्रयत्न केले जात आहेत. आज पुन्हा एकदा याच संधर्भात एक नवी माहिती समोर आली आहे. काँग्रेसचे खासदार धीरज साहू यांच्यावरील छापेमारीत 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रोकड विभागाला आढळून आली आहे. खासदार साहू यांच्या बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर बुधवार पासून छापेमारी सुरु आहे.

मोदींनी सोडले काँग्रेसवर टीकास्त्र:

देशाचे पंतप्रधान मोदी यांनी ट्विटरचा वापर करून सदर प्रकाराची माहिती जगासमोर आणली. त्यांची हि पोस्ट सध्या लोकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे. या पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओडिशा आणि झारखंड येथे खासदारांच्या कंपनीवर पडलेल्या प्राप्तिकर विभागाच्या छापेमारीची बातमी दिली आहे. आणि या घटनेचे उदाहरण घेऊन त्यांनी विरोधी पक्ष म्हणजेच काँग्रेसवर टीकास्त्र सोडले आहे. पोस्टमध्ये पंतप्रधान म्हणतात कि,”देशातील नागरिकांनी आधी या पैश्यांच्या ढिगाकडे पाहावं आणि त्यानंतर पक्षाच्या इमानदार नेत्यांची भाषणं ऐकावीत.” जनतेची लूट करून मिळवलेल्या प्रत्येक पैशाचा हिशोब द्यावा लागेल असा धाकही त्यांनी शब्दांमधून व्यक्त केला होता.

खासदार साहू हे काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. त्यांची जुलै 2020 मध्ये पक्षाच्या मदतीने राज्यसभेत स्थान मिळवले होते. साहू यांना झारखंड मधील मोठ्या आणि नावाजलेल्या नेत्यांपैकी एक मानलं जातं. मात्र या प्रकाराबद्दल (Odisha Raid) काँग्रेस पक्षाने कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

नेमका प्रकार आहे तरी काय? (Odisha Raid)

पंतप्रधानांच्या पोस्टची चर्चा सर्वत्र होत असली तरीही हा नेमका प्रकार काय आहे हे जाणून घेतलं पाहिजे. प्राप्तीकर विभागाने बुधवारी बौद्ध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवर छापा टाकला होता, आणि तेव्हापासून जप्त केलेल्या पैश्यांच्या मोजणीचे काम सुरूच आहे. माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार आत्तापर्यंत 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेची मोजणी झाली आहे आणि हा आकडा 250 कोटी रुपयांच्या आसपास देखील जाऊन अशी शक्यता आहे. हि धाड (Odisha Raid) खासदार धीरज साहू यांच्या कंपनीविरुद्ध आहे.

प्राप्तीकर विभागाकडून साहू यांच्या संबंधित झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओडिसा अश्या ठिकाणांवर धाड मारण्यात आली होती, आणि हि धाड यशस्वी झाली असून आत्तापर्यंत 200 कोटी रुपयांपेक्षा अधिक रोख रक्कम विभागाने हस्तगत केली आहे. माध्यमांना मिलेल्या माहितीनुसार सर्वाधिक रोख ओडिशामध्ये सापडली होती, 6 डिसेंबरपासून सुरु असलेली हि कारवाई आजही चालूच आहे. सूत्रांची माहिती सांगते कि ओडिशामध्ये छापा मारल्यानंतर बोलांगिरी जिल्ह्यातील सुदापाडा या भागातून 150 पेक्षा अधिक बॉक्सस आढळून आले, ज्यांमध्ये रोख रक्कम भरलेली होती. सध्या या प्रदेशात विभागाकडून कित्येक नोटमोजणी यंत्रांचा वापर करून नोट मोजणी सुरु आहे तरीही हे काम काही संपुष्टात येण्याचं नाव घेत नाही (Odisha Raid). प्राप्तीकर विभागाला मद्य वितरक, विक्रेते आणि इतर व्यावसायिकांकडून या गुन्ह्याची माहिती मिळाली होती.