Offline UPI Payment: आता इंटरनेट नसतानाही पाठवा एकमेकांना पैसे; या स्टेप्स फॉलो करा

बिझनेसनामा ऑनलाईन । भारत सध्या कॅशलेस होत चाललाय, लहान मोठी रक्कम देताना आता हातात तेवढे पैसे असण्याची गरज नाही. मोबाईलच्या मदतीने तुम्ही लगेचच हे काम करू शकता. गुगल पे, फोन पे या अँपच्या माध्यमातून आपण ऑनलाईन पद्धतीने एकमेकांना पैसे पाठवत होतो. परंतु अशा प्रकारच्या पेमेंट साठी आत्तापर्यंत गरज होती ती केवळ इंटरनेटची पण नवीन समोर आलेल्या बातमीनुसार तुम्ही इंटरनेट शिवाय सुद्धा UPI payment करू (Offline UPI Payment) शकता. हे पेमेंट नेमकं कस होईल हेच आज आम्ही आपणास सांगणार आहोत.

काय आहे Offline UPI Payment?

हल्ली बऱ्याचवेळा आपण Online Payment चा वापर करतो, यामुळे हातात पैसे घेऊन फिरण्याची गरज आता उरलेली नाही. पण या आधुनिक जगात दिवसेंदिवस बदल होत असतात, त्यामुळे इंटरनेट शिवाय सुद्धा हे Payments करता येतात. अनेकवेळा पैसे देताना आपला इंटरनेट चालत नाही आणि हातात पैसे नसल्याने तारांबळ उडते. अश्यावेळी आत्ता Offline UPI Payment आपली भरपूर मदत करणार आहे.

कसं कराल Offline UPI Payment?

जर का तुमच्याजवळ इंटरनेट नसेल किंवा एखाद्यावेळी एका ठिकाणी नेटवर्क मिळत नसेल तत्र तुम्ही नक्कीच या Offline UPI Payment चा वापर करून पाहावा. आपल्या मोबाईल वरून *99# डायल करुन हे UPI Payment करता येतं. पण या साठी UPI App वर तुमचे अकाऊट असणं भाग आहे, सोबतच बँक सोबत तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्यावा. देशातील सर्व मोबईल कंपनी *99# च्या सेवा उपलब्ध करून देतात. या सेवा हिंदी व इंग्रजी दोन्ही भाष्यांमध्ये उपलब्ध आहेत.

Offline UPI Payment प्रक्रिया कशी चालते?

१) *99# डाइल करा

या नंतर तुम्हाला My Profile, Send Money ,Receive Money इत्यादी असे पर्याय दिसतील.

पैसे देण्यासाठी Send Money या पर्यायाची निवड करावी.

त्या नंतर Send Money च्या समोर येणारा नंबर डाइल करावा.

UPI वरून पैसे पाठवण्याचा पर्याय निवडावा, व नंतर ज्या रिसीवरवरून पैसे पाठवायचे आहेत त्याची निवड करावी.

पैश्यांची रक्कम नमूद करावी व Send चा पर्याय निवडावा.( इथे तुम्हाला 50 पैसे चार्ज द्यावा लागतो.)