Ola Electric लवकरच IPO आणण्याच्या तयारीत

बिझनेसनामा ऑनलाईन । इनिशियल पब्लिक ऑफरिंग म्हणजेच IPO मध्ये गुंतवणूक करून चांगल्या प्रमाणात पैसा कमवण्याच्या प्रयत्न करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. याचे कारण म्हणजे ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) 2024 च्या सुरुवातीला IPO आणण्याच्या तयारीत आहे. येव्हडच नव्हे तर यासाठी कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी आणि गोल्डमन सॅक्स यांना पार्टनर म्हणून नियुक्त करण्याची चर्चा सुद्धा सुरू झाली आहे.

कंपनीने सांगितले की, मे महिन्यात IPO बाबत अनेक देशी आणि विदेशी गुंतवणूक बँकांसोबत बैठक झाली. याबाबत अद्याप कोणतीही मुदत निश्चित करण्यात आलेली नाही. परंतु सध्या सुरु असलेल्या चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन किंवा ४ महिन्याच्या आसपास ओला इलेक्ट्रिकचा IPO लॉन्च केला जाऊ शकते. अंदाजानुसार, ओला इलेक्ट्रिकचा हा IPO 6600 कोटी ते 8000 कोटी रुपयांचा असू शकतो.

ओला इलेक्ट्रिक कोटक महिंद्रा कॅपिटल आणि गोल्डमन सॅक्स यांना आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्त करण्याची कंपनीची योजना आहे. आणखी कमीत कमी दोन गुंतवणूक बँकांमध्ये सहभागी होण्याची योजना आखत आहे. कंपनीने अमरचंद मंगलदास यांना IPO साठी कायदेशीर सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. ओला इलेक्ट्रिक ही IPO मध्ये लिस्टेड होणारी पहिली भारतीय ईव्ही निर्माता कंपनी असेल.