Ola Electric : माध्यमांना काल Ola इलेक्ट्रिकबद्दल एक महत्त्वाची माहिती मिळाली आहे. ओलाचे सह संस्थापक आणि सीईओ भविष्य अग्रवाल यांनी ग्लोबल इन्व्हेस्टमेंट मीटमध्ये मध्ये ही माहिती सर्वांसाठी जाहीर केली. कंपनीचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार तमिळनाडू मधल्या कृष्णगिरी जिल्ह्यात कंपनीचे नवीन उत्पादन युनिट लवकरच सुरू होणार आहे. कंपनीकडून जाहीर करण्यात आलेली ही माहिती अनेकांसाठी फायदेशीर ठरेल, कारण हे युनिट पूर्ण झाल्यानंतर जवळपास 25 हजार लोकांना नोकऱ्या मिळण्याची शक्यता आहे.
कंपनीच्या मालकाने दिलेल्या माहितीनुसार या युनिटच्या उत्पादनक्षमते व्यतिरिक्त 2000 एकर मध्ये विक्रेता आणि पुरवठा यांचे साखळी देखील निर्माण केली जाईल. कंपनीला येणाऱ्या काळात EV चे जागतिक केंद्र बनवण्याची इच्छा आहे व म्हणूनच असे छोटे-छोटे पाळले गाठत कंपनीचा प्रवास सुरू आहे. ओला ही कंपनी बऱ्याच प्रमाणात प्रसिद्ध आहे, इलेक्ट्रिक आधारावर चालणाऱ्या त्यांच्या दुचाकी गाड्या पर्यावरणाला मदत करतात व म्हणूनच अनेक वापरकर्त्यांकडून ओलाला पसंती दिली जाते.
तमिळनाडूमध्ये उभे राहणार ओलाचे नवीन युनीट: (Ola Electric)
गेल्या आठ महिन्यात भारतात दुचाकी उत्पादन सुविधा उभारण्यात यश संपादन केलेल्या ओला कंपनीने लगेच तमिळनाडूमध्ये देखील उत्पादनाची सुरुवात करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पुढील महिन्यापासूनच याचे उत्पादनही सुरू होईल आणि हा कारखाना संपूर्ण क्षमतेने चालवला जाईल. या नवीन युनिटमधून दरवर्षी 1 कोटी दुचाकी तयार करण्याचे ध्येय असल्याची माहिती कंपनीच्या मालकाने जाहीर केली होती. वर्ष 2023च्या जानेवारी महिन्यात ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) ने तामिळनाडूमध्ये 7000 कोटींची गुंतवणूक करण्यासाठी राज्य सरकार सोबत एक करार पूर्ण केला होता.
ओला इलेक्ट्रिक (Ola Electric) कंपनी सध्या दुचाकी विभागातील सर्वाधिक खप होत असलेली मार्केट लीडर म्हणून ओळखली जाते. गेल्या नोव्हेंबर पर्यंत कंपनीतील बाजार व्यवस्था पाहिली तर याचा आकडा सुमारे 32 टक्यांपर्यंत गेला होता. येणाऱ्या काळात जर व्यवसाय अशाच प्रकारे वृद्धिंगत होत राहिला तर नक्कीच कंपनीत 50 टक्के बाजारी भाग काबीज करू शकते. आतापर्यंत त्यांनी सुमारे 30 हजार वाहनांची विक्री केली आहे. अनेकांच्या मनात स्थान पक्क करण्यात यशस्वी झालेली ओला कंपनीची ही यशस्वी घोडदौड म्हणावी लागेल. तमिळनाडू राज्याचे ट्रेड सेंटर म्हणजेच चेन्नई, येथे काल ग्लोबल इन्वेस्टर मिनिटचे उद्घाटन करण्यात आले होते. 7 आणि 8 जानेवारी अशा दोन दिवसांच्या कालावधीत इथे ग्लोबल इन्वेस्टरची बैठक होणार आहे व या बैठकीत देश-विदेशातील अनेक मोठमोठे गुंतवणूकदारी सहभागी होतील.