खिशात 100 कोटींचे शेअर्स, तरीही साधी राहणीमान; ‘त्या’ आजोबांनी वेधले लक्ष्य

बिझनेसनामा ऑनलाईन । आत्तापर्यंत शेअर मार्केट मधील गुंतवणूकदरांची भली मोठी नावं तुम्ही ऐकली असतील. हे दिग्गज आपल्या बुद्धीचा वापर करत शेअर बाजार गाजवतात. यात राधाकिशन दमानी, राकेश झुनझुनवाला, डॉली खन्ना इत्यादी नावं सातत्याने ऐकायला मिळतात. या सर्वांची राहणीमान, लाइफस्टाइल सुद्धा औरच असते. मात्र अलीकडेच सोशल मिडियावर एका अशा आजोबांचा व्हिडिओ वायरल होत आहे ज्यांच्याकडे वेगवेगळ्या कंपनीचे तब्बल १०० करोडोंचे शेअर्स आहेत परंतु त्यांच्या सध्या राहणीमानाने ते चर्चेच्या केंद्रस्थानी ठरत आहेत

व्हिडीयोमध्ये नेमकं काय आहे?

सोशल मिडीयावर पसरणाऱ्या या व्हिडीयोमध्ये एक आजोबा दिसतात. त्यांच्या अंगावर एखाद्या गावातील माणसाप्रमाणे साधे कपडे आहेत आणि त्यांचा पायात धड चप्पलहि नाही .तुटलेले दात आणि हाफ पेंट घातलेले आजोबा करोडोंची गुंतवणूक केल्याचा दावा करत आहेत. त्यांच्या म्हणण्यावरून ते शेअर बाजारातील बिग बुलपेक्षा कामी वाटत नाहीत. ते शेकडो कोटींहून जास्ती शेअर्स आपल्यासोबत घेऊन फिरत आहेत. एवढे पैसे असून सुद्धा एकदम साधं राहणीमान असलेल्या या आजोबांकडे सगळ्याचं लक्ष जात आहे.

राजीव मेहेता नावाच्या एका माणसाने हा व्हिडियो X ( Twitter) वर शेअर केला. एका सर्वसामान्य माणसाकडे L&Tचे 80 कोटी रुपयांचे शेअर्स, अल्ट्राटेकचे 21 कोटी रुपये आणि कर्नाटक बँकचे शेअर्स धरून त्यांच्याकडे एकूण 102 कोटी रुपयांचे शेअर्स आहेत. दरम्यान, शेअर्स मधली गुंतवणूक हि एक आर्थिक जोखीम आहे, असे व्हिडीयोज कितीही फिरत असले तरीही गुंतवणूक करण्याआधी संपूर्ण माहिती मिळवून घ्यावी.