One Day Internship: Britannia मध्ये Internship करण्याची भन्नाट संधी; कमवाल 3 लाख रुपये

One Day Internship: भारतातील एका नावाजलेल्या कंपनीमध्ये Internship करण्याची संधी उपलब्ध झाली असून ही Internship भारतीयांच्या आवडीची फूड कंपनी ब्रिटानियाकडून दिली जात आहे. Croissant pronunciation expert पदासाठीची एक दिवसाची Internship आहे आणि या पदासाठी निवडलेल्या उमेदवाराला तब्बल 3 लाख रुपये मिळतील.

काय आहे ही संधी? (One Day Internship)

Croissant ची जास्तिक लोकांना आवडते पण त्या उच्चार कसा करायचा हे मात्र अनेकांना कळत नाही आणि म्हणूनच ब्रिटानिया कंपनीकडून ही भन्नाट संधी उपलब्ध करून दिली जात आहे. त्यांच्याकडे ‘Croissant उच्चार तज्ञ’ म्हणून काम करण्याची एक दिवसाची Internship आहे. या Internship साठी निवड झालेल्या व्यक्तीला ब्रिटानियाच्या ऑफिसमध्ये एक दिवस घालवून लोकांना Croissant उच्चारायला शिकवण्यासाठी तब्ब्ल 3 लाख रुपये मिळतील.

या कंपनीच्या इंटर्नशिपची बंधने काय?

ब्रिटानिया या प्रसिद्ध कंपनीमध्ये इंटर्नशिप करण्यासाठी तुम्ही 18 वर्षांचे किंवा त्याहून मोठे असू शकता. यामध्ये तुम्हाला भाषा, उच्चार किंवा बेकरीच्या पदार्थांची आवड असली तर अशी मंडळी खास पसंतीत उतरणार आहेत, एकंदरीत कोणत्याही क्षेत्रातील तरुणांसाठी ही संधी खुली आहे.

या Internship मध्ये नाव कसं नोंदवाल?

ब्रिटानिया कंपनीमध्ये Croissantचा उच्चर तज्ञ म्हणून रुजू होण्यासाठी तुम्ही Whatsapp वरून अर्ज भरू शकता किंवा ब्रिटानिया Croissant च्या Instagram Bio वर असलेली रजिस्ट्रेशन लिंक शोधून ही प्रक्रिया पूर्ण करू शकता(One Day Internship). यानंतर Whatsapp वर तुम्हाला काही मूलभूत प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील, इच्छुक उमेदवारांना nstagram वर दोन आवश्यक कार्ये पूर्ण करण्यासाठी मार्गदर्शन केले जाईल. लक्ष्यात ठेवा हा अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे 10 मार्च 2024, यानंतर कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.