बिझनेसनामा ऑनलाइन | Amazon आणि Flipkart च्या धर्तीवर केंद्र सरकार ई-मार्केटप्लेस (GeM), ऑनलाइन सार्वजनिक खरेदी प्लॅटफॉर्मवर ‘एक जिल्हा एक उत्पादन’ (ODOP) ला प्रोत्साहन देण्याचा विचार करत आहे. तर One District One Product नेमकं काय आहे आणि सरकार का देतेय या योजनेला पाठींबा हे जाणून घेण्यासाठी ही बातमी नक्की वाचा…
One District, One Product म्हणजे काय?
One District One Product या योजनेचा वापर करून केंद्र सरकार प्रादेशिक विकासावर लक्ष केंद्रित करत असते. या योजनेद्वारे सरकार सर्वांगीण आर्थिक वाढ करू पाहत आहे. या योजनेमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून किमान एक प्रोडक्ट निवडून त्याचा ब्रॅंड तयार करणे व नंतर त्याचा प्रचार करणे अशी प्रक्रिया असते. आत्तापर्यंत 761 जिल्ह्यांमधून एकूण 1102 प्रोडक्टची ओळख तयार झाली आहे.
का सरकार ह्या योजनेला नेतोय Online?
आत्तापर्यंत GeM वर 350 गट तयार केले गेले आहेत. ज्यामध्ये One District One Product (ODOP) उत्पादने आणि शेतकरी उत्पादानांच्या खरेदीत 878 कोटी रुपयांची भर पडली आहे. या शिवाय 100 संस्थांकडून सुमारे 46,000 ऑर्डर्स मिळाल्याचा अंदाज साईट द्वारे जाहीर करण्यात आला आहे.
वायनाडपासून रोबस्टा कॉफी आणि एलजी, लडाख ते पुरीपासून पट्टाचित्र उत्पादनांसाठी पीएमओ, अणुऊर्जा विभाग आणि इन्व्हेस्ट इंडिया यांच्या ऑर्डरचा समावेश आहे. याशिवाय भारतीय वायुसेनेकडून शहापूर वूडक्राफ्टची खरेदी केली गेली आहे.
उपक्रमाचा एक भाग म्हणून GeM ने राज्यस्तरावर आपले जाळे पासरवल्यानंतर विक्रेत्यांना बोर्डावर आणणं हे त्यांच्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. हस्तकला व मातीची भांडी यांसारख्या उत्पादनांची विक्री हे आत्ता मुख्य ध्येय असणार आहे .