Onion-Tomato Hike : ताटातलं जेवण महागलं; कांदा-टोमॅटो आणणार डोळ्यात पाणी

Onion-Tomato Hike : आपल्यापैकी अनेकजण खवय्ये असतील, म्हणजे कोण तर वेगवेगळ्या पदार्थांवर मनापासून प्रेम करणारी लोकं. आजकाल Food Blogging किंवा Vlogging अशी एक संकल्पना सोशल मीडियाच्या काळात तयार झाली आहे. जेवण म्हंटल कि त्यामध्ये कांदा आणि टोमॅटो आलाच.. या दोन्ही पदार्थांशिवाय चविष्ट जेवण तयार करणं शक्य नाही. त्यामुळे कांदा आणि टोमॅटोची मागणी हि सतत वाढतच असते. परंतु आता सर्वसामान्य जनतेसाठी मोठा झटका आहे, याचे कारण म्हणजे कांदा आणि टोमॅटो या जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत.

आता जेवण महागणार: (Onion-Tomato Hike)

तुमच्या ताटातलं जेवण महागण्याचं प्रमुख कारण आहे कांदा आणि टोमॅटो. टोमॅटोच्या किमतींमध्ये एकूण 58 टक्क्यांची वाढ झालेली आहे, तर कांदा 35 टक्क्यांनी वाढलाय. या दोन्ही किंमतीच्या आधारे शाकाहारी जेवण्याच्या किमतीमध्ये वार्षिक दारांत 9 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच डाळींच्या किमतींमध्ये 21 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. महागाईचं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय आणि याची सर्वाधिक झळ सामान्य माणसाला म्हणजेच मध्यमवर्गीय लोकांना बसणार आहे. टोमॅटो आणि कांद्याने बांधलेलं संधान आपल्याला डोकयावरचा घाम नक्कीच वाढवेल. क्रिकेटच्या सामन्यात ज्याप्रामणे दोन्ही बेट्समन दमदार खेळी करून बॉलरचं जिणं मुश्किल करतात त्याच प्रमाणे आता कांदा आणि टॉमेटो (Onion-Tomato Hike) सोबात येऊन आपल्याला सळो-की – पळो करण्याच्या मार्गावर आहेत.

ऑक्टोबर महिन्यांत कमी झाला होता आकडा:

महागाईशी दोन हात आपण गेल्या अनेक दिवसांपासून करत आहोत. आधी टॉमेटोच्या किमती आकाशाला जाऊन टेकल्या आणि त्यानंतर कांद्याने डोळ्यात पाणी आणायला सुरुवात केली होती. मात्र ऑक्टोबर महिन्यापर्यंत देशात मांसाहारी आणि शाकाहारी थाळीची किंमत तशी काहीशी आटोक्यात होती. शाकाहारी थाळीत 5 टक्के तर मांसाहारी थाळीत 7 टक्क्यांची घट दिसून आली होती. क्रिसिल हि एक रेटिंग एजन्सी आहे, त्यांच्या अनुसार गेल्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळीच्या (Onion-Tomato Hike) किमतींमध्ये महिन्याच्या तुलनेत 10 आणि 5 टक्क्यांची वाढ झाली होती.

मांसाहारी जेवणाचा विचार करायचा झाला तर 95 टक्के मांसाहारी जेवणात चिकनचा समावेश होतो. गेल्या महिन्यात चिकनच्या किमतींमध्ये 1 ते 3 टक्क्यांची घसरण झाली होती. येणाऱ्या काळात हे आकडे अजूनच वाढण्याची शकयता आहे. आपल्या देशात अनेक मंडळी शिक्षण आणि नोकरी निमित्त घराबाहेर राहतात त्यामुळे अश्या समूहाला वाढलेल्या जेवणाच्या किमतींचा जास्ती फटका (Onion-Tomato Hike) बसू शकतो.